Bigg Boss Marathi Season 5 Prize Money : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सीझनच्या ग्रॅड फिनालेला अवघे दोनच दिवस उरले आहेत. आणि बिग बॉसने अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर असे सहा फायनलिस्ट जाहीर केले आहेत. या सदस्यांपैकी एक सदस्य आज घराबाहेर पडणार आहे. त्यानंतर टॉप 5 सदस्य थेट फायनलमध्ये जाणार आहेत. असे असताना बिग बॉसचा हा सीझन जिंकणाऱ्या सदस्याला नेमके किती बक्षीस रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (bigg boss marathi season 5 prize money how much price money will get winner suraj chavan abhijit sawant nikki tamboli)
ADVERTISEMENT
मिडविक इविक्शनमध्ये 'या' सदस्यांची विकेट
बिग बॉसच्या घरात गुरूवारी मिडविक इविक्शन पार पडलं होतं. निक्की तांबोळी ही 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती नॉमिनेशन पासून वाचली होती तर उर्वरीत सहा सदस्य हे घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट ठरले होते. यामध्ये अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर या सदस्यांचा समावेश होता. या सदस्यांपैकी वर्षा उसगांवकर या घराबाहेर पडल्या आहेत.
हे ही वाचा : Gold-Silver Price: सोन्याचा तर विषयच हार्ड! किंमतीही धमाकेदार... आजचे भाव किती रूपयांनी वाढले?
बिग बॉसचे सहा फायनलीस्ट
निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली होती. निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजीत सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला. अभिजीत नंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवारने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. धनंजय यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली. तर पाचव्या क्रमांकावर सूरज चव्हाण याने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली होती.
टॉप-5 स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडवीक एविक्शन पार पडलं. अंकिता आणि वर्षा बॉटम – 2 स्पर्धक होत्या. शेवटी बिग बॉसने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगांवकरांचा घरातील प्रवास 67 दिवसांनी संपला. अशाप्रकारे वंडर गर्ल वर्षा उसगांवकर यांनी घराचा निरोप घेतला.
हे ही वाचा : Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?
विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार?
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जिंकणाऱ्या सदस्याला ट्रॉफी आणि 25 लाख रूपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार आहे. सध्या विजेता म्हणून अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी या सदस्यांची नावे चर्चेत आहेत. या सदस्यांपैकी एक सदस्य आता विजेता ठरणार आहे. हा सदस्य कोण असणार आहे, हे आपल्याला 6 ऑक्टोबरला कळणार आहे.
ADVERTISEMENT