Anant Ambani Radhika Merchant Wedding : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकला आहे. शुक्रवारी दोघांचा हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील पाहूण्यांनी हजेरी लावली होती.तसेच शनिवारी पार पडलेल्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Pm Narendra Modi) अनेक पाहुण्यांनी उपस्थित राहून जोडप्यांना आशीर्वाद दिले होते. या सोहळ्यानंतर आता अंबानींनी त्यांच्या खास व्हिआयपी पाहूण्यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट नेमकं काय आहे? या गिफ्टची किंमत नेमकी किती आहे? हे जाणून घेऊयात. (anant ambani radhika merchant wedding all vip guests given these watches see her price)
ADVERTISEMENT
अंबानी कुटुंबाच्या या भव्य विवाह सोहळ्यात देशासह जगभरातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. यासोबत अनंत अंबानीचे अनेक मित्र देखील या लग्नाला उपस्थित होते. यामध्ये मीझान जाफरी, शिखर धवन, हार्दिक पांड्यापासून वीर पहाडियापर्यंत सर्वांचा समावेश होता. या लग्न सोहळ्यात आता उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना अंबानी कुटुंबियांनी लक्झरी गिफ्ट दिले आहे. या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले
व्हीआयपी पाहुण्यांना काय गिफ्ट दिलं?
मीडिया रिपोर्टनुसार, अंबानींच्या लग्नात उपस्थित राहणाऱ्या सर्व व्हिआयपी पाहुण्यांना लग्झरी घड्याळे भेट देण्यात आली आहेत. Audemard Piguet या लक्झरी ब्रँडची ही घड्याळे आहे. या घड्याळाची बाजारातील किंमत सुमारे 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये आहे.
करोडोंच्या घरात गिफ्टची किंमत?
18K रोज गोल्डने बनलेल्या या घड्याळात नीलम क्रिस्टलसह डार्क ब्ल्यू डायल आहे. अनंत अंबानी यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना आणि मित्रांना भेट देण्यासाठी या मर्यादित आवृत्तीच्या घड्याळांचे 25 सेट ऑर्डर केले होते. रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत $250,000 किंवा अंदाजे 2,08,79,000 रुपये आहे. शाहरुख खानपासून ते रणवीर सिंगपर्यंत, मीझान जाफरी ते वीर पहाडियापर्यंत हे पाहूणे लक्झरी घड्याळ दाखवताना दिसले आहेत.
PM मोदींनी दिले शुभ आशीर्वाद
12 जुलै रोजी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये विवाहसोहळा पार पडल्यानंतर, 13 जुलै रोजी अनंत-राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. यावेळी त्यांनी जोडप्याला शुभ आशीर्वाद दिले. या सोहळ्यात पीएम मोदींशिवाय चंद्राबाबू नायडूंपासून आदिगुरु शंकराचार्यांपर्यंत त्यात सहभागी झाले होते.
हे ही वाचा : Vishalgad Encroachment : विशाळगडावर दगडफेक! महिला, नागरिकांना मारहाण
दरम्यान या शुभ आशीर्वाद सोहळ्यात बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, सनातन धर्मात विवाह हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो. अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व संतांचे आणि इतर पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले.आमचे कुलदैवत, ग्रामदैवत, अध्यक्ष दैवत आणि देव यांचा आशीर्वाद वधू-वरांवर राहो, जय श्री कृष्ण. ज्याप्रमाणे भगवान विष्णूच्या काळात लक्ष्मी देवी वास करते, त्याचप्रमाणे अनंतही राधिकाला आपल्या हृदयात ठेवतील, असे अंबानी यांनी म्हटले.
ADVERTISEMENT