Kalyan Crime : कल्याण-डोंबिवलीत तृतीयपंथीय चोरट्यांचा सुळसुळाट! बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरात जायचे अन् जे करायचे...

मिथिलेश गुप्ता

16 Sep 2024 (अपडेटेड: 16 Sep 2024, 05:24 PM)

Kalyan Dombivali Crime Update : ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तृतीतपंथीय चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असून चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.

Kalyan Robbery Crime

Kalyan Crime Latest Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण-डोंबिवलीत तृतीयपंथीय चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ

point

तृतीयपंथीय चोरटे गणपती दर्शनासाठी घरात जायचे अन्...

point

त्या घरी संधीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केला लाखो रुपयांचा ऐवज

Kalyan Dombivali Crime Update : ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तृतीतपंथीय चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असून चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. हे तृतीयपंथीय गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या घरी जायचे आणि नाचता नाचता पैसे मागायचे. त्याचवेळी हे चोरटे घरातील सोन्याचे दागिने चोरायचे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (A sensational incident has been reported from Kalyan in Thane district. A gang of transgender thieves has been active and the thefts were caught on CCTV cameras)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली परिसरात तृतीयपंथीय चोरट्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. हे चोरटे गणेशोत्सवात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या घरी जातात. त्याचवेळी ते घरात नाचत राहतात. घरच्या माणसांची नजर चुकवून हे चोरटे लाखो रुपयांचा ऐवज लंपास करतात. लोकांचे पैसे आणि सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut: "जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांची...", निवडणुकीच्या तारखेवरून राऊतांनी मोदी-शहांना घेरलं

कल्याणच्या वाडेघर परिसरात राहणारे व्यापारी सुरेंद्र चंद्रकांत पाटील यांच्या घरी घडली. तृतीयपंथीय चोरट्यांनी पाटील यांच्या घरात घुसून 15 तोळे आणि 2 लाख 40 हजार रुपयांचा सोन्याचा मंगळसूत्र चोरला. पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरी पुढील तपास सुरु आहे. 

पाटील यांच्या आईने सोन्याचे दोन मंगळसूत्र एका बॅगेत ठेवले होते आणि ती बॅग गणपती मखरजवळ ठेवली होती. घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेल्यावर तृतीयपंथीय चोरट्यांनी घरात घुसून पैशांची मागणी केली. त्याचदरम्यान एका चोराने संधीचा फायदा घेत सोनं ठेवलेली बॅग चोरली. या घटनेची माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांनी कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

    follow whatsapp