Bigg Boss Marathi: सबसे कातील गौतमी पाटील बिग बॉसमध्ये दिसणार?

मुंबई तक

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 10:51 PM)

Gautami Patil News : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझनची खूप चर्चेत आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सरना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन होतंय. अशात आता सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) ही प्रसिद्ध डान्सर बिग बॉसमध्ये (Bigg Boss Marathi) एन्ट्री मारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे.

gautami patil reaction on bigg boss marathi participation and suraj chavan her favourite contestant

गौतमी पाटीलची होणार बिग बॉसमध्ये एन्ट्री?

follow google news

बातम्या हायलाइट

point

गौतमी पाटीलची होणार बिग बॉसमध्ये झळकणार?

point

बिग बॉसमध्ये एन्ट्री होण्याची चर्चा?

point

बिग बॉसच्या या कटेंस्टंटला गौतमी करते सपोर्ट

Gautami Patil, Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझनची खूप चर्चेत आहे. या सीझनमध्ये पहिल्यांदाच सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सरना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन होतंय. अशात आता सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) ही प्रसिद्ध डान्सर बिग बॉसमध्ये (Bigg Boss Marathi) एन्ट्री मारणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सूरू आहे. पण या चर्चेत आता किती तथ्य आहे? यावर आता गौतमीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (gautami patil reaction on bigg boss marathi participation and suraj chavan her favourite contestant) 

हे वाचलं का?

गौतमी पाटीले स्टार मीडिया मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत गौतमी पाटीलने तिच्या बिग बॉस प्रवेशाच्या चर्चावर भाष्य केले आहे. गौतमी पाटीलला बिग बॉस शोमध्ये जायला आवडेल का? असा सवाल तिला विचारण्यात आला होता. यावर गौतमी पाटील म्हणाली की, 'मी घरीच नसते. माझा बाहेरचा दौरा खूप असतो. म्हणून मला टीव्ही आणि सिनेमा बघता येत नाही. पण या दोन्ही गोष्टीचा खूप इंटरेस्ट आहे, पण ते मी बघू शकत नाही. कारण माझा बाहेरचा दौराच खूप असतो, असे गौतमी पाटीलने सांगितले आहे. त्यामुळे गौतमीला घरात जायला आवडणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तसेच बिग बॉस प्रवेशाच्या चर्चावर गौतमीने  नो कमेंटस असं उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : Vanraj Andekar: बहिणींनीच भावाची सुपारी दिली, दाजींनी असा केला वनराजचा गेम... Inside स्टोरी!

गौतमी बिग बॉसच्या घरातील कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करते किंवा कोणता स्पर्धक जिंकावा असं तिला वाटतं, यावर मात्र गौतमीने स्पष्ट भाष्य केलं आहे. गौतमीने बिग बॉसमधल्या सुरज चव्हाणला सपोर्ट केले आहे. ''सुरज बेस्ट ऑफ लक, तूच जिंकून ये'', अशा शुभेच्छाही गौतमीने सुरूज चव्हाणला दिला आहे. 

गौतमी पाटील कुणाला आदर्श मानते? असा सवाल तिला विचारण्यात आला होता? यावर गौतमी पाटील म्हणते की मी सुरेखा ताईंनाच मी आदर्श मानते. कारण आतापर्यंत त्यांनीच लावणी जपलीय. मला बरेच लोकं म्हणतात मी लावणी लावणी करते पण मी डिजे शो करते,असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले आहे.

दरम्यान बिग बॉसमध्ये सुरज चव्हाणचा गेम अनेक प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. तो ज्या प्रकारे बिग बॉसमध्ये खेळतोय. ज्या प्रकारे इतर प्रतिस्पर्धींशी भिडतोय. हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. त्यामुळे बिग बॉस सुरज चव्हाण जिंकेल अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे.

    follow whatsapp