Nimrat Kaur Instagram Viral Post: अभिनेत्री निमरत कौर अभिषेक बच्चनसोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या दोघांमध्ये डेटिंग होत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. अशातच निमरत कौरला नवीन पार्टनर मिळाला आहे. निमरतने नुकतच इन्स्टाग्रामवर या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला आहे. निमरतने शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याआधी निमरतने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये थिरकल्याचे फोटो शेअर केले होते.
ADVERTISEMENT
खरंतर निमरत कौरने नेहमीच म्हटलंय की, ती सिंगल आहे. तिने अभिषेक बच्चनसोबत 'दसवी' मध्ये काम केलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्यानं ऐश्वर्या राय-अभिषेकमध्ये बिनसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, या तिन्ही सेलिब्रिटींनी याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीय. आता निमरतने तिच्या नव्या पार्टनरचा फोटो शेअर केला आहे. 'अपने चाय के साथी के साथ घर वापसी' असं कॅप्शन निमरतने या फोटोला दिलं आहे.
हे ही वाचा >> 5 December 2024 Gold Rate: काय सांगता! ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? मुंबईत आजचा सोन्याचा भाव काय?
निमरत कौरला मिळाला नवा पार्टनर
निमरत मांजरीला तिच्या सोबत सोफ्यावर घेऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. निमरत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. फुलांच्या बागेत पोज देतानाचे फोटोही निमरतने नुकतेच शेअर केले आहेत. काही आठवड्यांपूर्वी 'दसवी' स्टारर अभिनेत्री निमरत एका पोस्टच्या माध्यमातून चर्चेत आली होती. निमरतने मैत्रीबाबत अर्थपूर्ण पोस्ट लिहिली आणि एक रिल बनवून ते इन्स्टाग्रामवर शेअर केलं.
हे ही वाचा >> Maharashtra CM Ceremony : भाजप, शिंदे गट अन् NCP चे कोण कोण होणार मंत्री? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी
या रिलमध्ये निमरत एका फरशीवर बसून एका ट्रेंडिग डायलॉगवर लिप-सिंक करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. फ्रेंडशिप एवढी पक्की असली पाहिजे की, लोकं ते पाहूनच जळले पाहिजेत, असं कॅप्शन निमरतने त्या पोस्टला दिलं होतं.निमरतने तिच्या डेटिंगच्या चर्चांच्या अफवांवर रिएक्ट करत म्हटलं होतं की, लोक नेहमी तेच बोलतील, जे त्यांना बोलायचं आहे. या फक्त गॉसिप आहेत. माझ्या कामावर फोकस करणं हे मला महत्त्वाचं वाटतं.
ADVERTISEMENT