Shankh: तुम्ही जर भारतातील हिंदू कुटुंबामध्ये (Hindu Family) जन्माला असाल तर तुम्हाला शंखची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. पूजा आणि कथा सांगताना देवासमोर शंख वाजवला जातो. शंख या गोष्टीशी संबंधित अनेक धार्मिक श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. शंख वाजवल्याने वातावरणात सकारात्मकात प्राप्त होते अशी भावना लोकांची आहे. तर काही लोकांचा असाही विश्वास आहे की, घरामध्ये जर शंख असेल तर त्यामुळे समृद्धी प्राप्त होत असते. अशा या शंखाची उपयुक्तता केवळ धर्मापुरती मर्यादित नाही तर शंख या एका गोष्टीमुळे शरीरातील (Health Benefits) अनेक अवयवांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे शंख का वाजवाव हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
ADVERTISEMENT
अनेकांना फुफ्फुसांचे रोग
सध्या वाढणाऱ्या वाहनांच्यामुळे प्रदूषणाचा फटका अनेकांना बसला आहे. त्यामुळे अनेकांना फुफ्फुसांचे रोग जडले आहेत. वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांमुळे फुफ्फुसेही कमकुवत आणि निकामी झाली आहेत. तर अनेका वेळा वाकून बसून असल्यामुळे फुफ्फुसावरही त्याचा दबाव वाढत असतो. त्यामुळे या अशा परिस्थितीत त्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा >> हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडले गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, जखमी जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
फुफ्फुसाच्या स्नायूंची वाढ
ज्या वेळी शंख वाजवण्यासाठी तो फुंकला जातो त्यावेळी फुफ्फुसाच्या स्नायूंची वाढ होत असते. शंख वाजवल्याने फुफ्फुसाला त्याचा फायदा होतो. फुप्फुसाच्या स्नायूंची वाढ झाल्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. त्याचा फायदा हृदयाला जास्त होतो. त्यामुळे शंख वाजवणे हे कोणाच्याही फुफ्फुसासाठी आणि हृदयासाठी चांगलेच आहे.
सौंदर्य फायदे
केवळ फुफ्फुसच नाही तर शंख वाजवल्याने तुमची मूत्रमार्ग, मान, मूत्राशय, पोटाचा खालचा भाग आणि डायाफ्रामचाही त्यामुळे व्यायाम होतो. शंख वाजवल्याने त्याचा फायदा तुमच्या सौंदर्यालाही होतो. जेव्हा तुम्ही शंख वाजवता तेव्हा चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे त्याचा थेट फायदा तुमच्या फेशियलसाठी होतो.
हे ही वाचा >> Maratha Reservation : “जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर…”, छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ
पाठीचे व्यायाम
शंख वाजवण्यासाठी लागणारी ताकद ही गुदाशयाच्या स्नायूंनाही बळकटी देते. त्याचा फायदा मूत्रमार्गासह पोटाच्या खालच्या भागाचाही व्यायाम होतो. काही तज्ज्ञांच्या मते ज्यांना बोलताना त्रास होतो, त्या बोलण्याच्या समस्या या शंख वाजवल्यामुले दूर होतात. त्यातच तोतरेपणाचा त्रास होत असेल तर काहींना शंख वाजवण्याचाही सल्ला दिला जातो.
टीप: तुम्हाला श्वसन किंवा हृदयाशी संबंधित आजार असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच शंख वाजवावा
ADVERTISEMENT