Credit Card, LPG And Train Ticket Rule Change: प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्ड (Credit Card), LPG आणि ट्रेन तिकीट (Train Ticket) पासून फडीच्या डेडलाईनपर्यंतचे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार असल्याची माहिती आहे. याचा थेट सामान्य माणसांच्या जीवनावर होणार आहे. म्हणजेच या नियमांमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्रीच लागणार आहे. पुढच्या महिन्यापासून कोणकोणते नियम बदलणार आहेत आणि याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
पहिला बदल - एलपीजी (LPG) सिलेंडरचे दर
दर महिन्याच्या प्रत्येक तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत (LPG Cylinder Price) बदल करतात आणि नवीन रेट जारी करतात. यावेळी 1 नोव्हेंबरला दिलेल्या किंमतीबाबत संशोधन होऊ शकतं. लोकांना यावेळीही 14 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची किंमत कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पण कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दराबाबत बोलायचं झालं, तर 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत जुलैमध्ये घट करण्यात आली होती. परंतु, सलग तीन महिने यामध्ये वाढ होताना दिसत आहे.
दुसरा बदल - ATF आणि CNG-PNG चे रेट
ऑयल मार्केटिंग कंपनी दर महिन्याच्या प्रत्येक तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती तपासतात. गेल्या काही महिन्यांपासून हवाई इंधानाच्या दरात कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळीही उत्सवानिमित्त किंमती कमी केल्या जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
हे ही वाचा >> Majhi Ladki Bahin Yojana Status Check: अजूनही पैसे मिळाले नाहीत? फक्त एकच काम करा अन्...
तिसरा बदल - क्रेडिट कार्ड नियम
स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) सब्सिडियरी एसबीआय कार्ड (SBI Card) मध्ये एक नोव्हेंबरपासून मोठा बदल होणार आहे. हा नियम क्रेडिट कार्डच्या यूटिलिटी बिल पेमेंट्स आणि फायनान्स चार्जेसशी जोडला गेला आहे. 1 नोव्हेंबरपासून अन- सेक्युअर्ड एसबीआय क्रेडिट कार्डवर दर महिन्याला 3.75 फायनान्स चार्ज द्यावा लागेल. याशिवाय वीज, पानी, एलपीजी गॅससह अन्य यूटिलिटी सर्विसमध्ये 50 हजार रुपयांहून अधिक पेमेंटवर 1 टक्क्याहून अधक अतिरिक्त शुल्क लागेल.
चौथा बदल - मनी ट्रान्सफरचा नियम
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने घरगुती मनी ट्रान्सफर (डीएमटी) साठी नव्या नियमांची घोषणा केली आहे. जी 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. या नियमांचा उपयोग बँकिंग चॅनलचा दुरुपयोग रोखण्यासाठी होणार आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट
ट्रेनच्या तिकीटात बदल
भारतीय रेल्वेची ट्रेन तिकीट अॅडवान्स रिझर्वेशन पीरियड (एआरपी), यामध्ये प्रवासाचा दिवस समाविष्ट नाहीय. 1 नोव्हेंबर 2024 पासून 120 दिवसांमध्ये 60 दिवस कमी करण्यात येतील. या नियमाच्या माध्यमातून तिकीट खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यास मदत होणार होईल. तसच प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यातही या उपयोग होईल.
सहावा बदल - 13 दिवस बँकांचे कामकाज नाही
नोव्हेंबरमध्ये उत्सव आणि पब्लिक होलिडेसोबत विधानसभा निवडणुकीमुळे काही दिवस बँक बंद राहतील. नोव्हेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. बँकांच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही बँक ऑनलाईन सर्विसचा वापर करू शकता. ही सेवा चोवीस तास सुरु राहते.
ADVERTISEMENT