Historic Pyramid of Sahura : ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननादरम्यान इतिहासात दडलेली रहस्ये नेहमीच उलगडत असतात. आता 4400 वर्ष जुन्या ऐतिहासिक ठिकाणी असेच उत्खनन करण्यात आले. त्यात काय सापडले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. हजारो वर्षांपूर्वी लोक कसे जगायचे तेही समोर आले आहे. हे उत्खनन इजिप्शियन पिरॅमिडमध्ये झाले. त्यात गुप्त कक्ष सापडले आहेत. ज्याचे फोटोही समोर आले आहेत. (Excavations of the 4400-year-old Historic Pyramid of Sahura Reveal shocking things)
ADVERTISEMENT
अनेकदा जेव्हा लोक पिरॅमिडचा विचार करतात तेव्हा त्यांच्या मनात फक्त त्रिकोणी आकार येतो. याच्या आत काय घडतं याचा विचार कोणीच करू शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचे उत्खनन सुरू आहे.
Gold Price Today : सोनं झालं खूपच स्वस्त… किती रुपयांनी घसरल्या किंमती?
साहुरेच्या पिरॅमिडमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना अलीकडेच पाचव्या राजवंशातील इजिप्शियन फारो साहुरेसाठी बांधलेल्या संरचनेत अनेक खोल्या सापडल्या. 2019 पासून, या 47 मीटर उंच पिरॅमिडची आणखी पडझड टाळण्यासाठी आणि आतील खोल्या स्वच्छ करण्यासाठी एक पुर्नस्थापना प्रकल्प सुरू आहे. या अंतर्गत पथकाने पूर्वी बंद असलेला एक कॉरिडॉर साफ केला. जेव्हा तो उघडला तेव्हा आत नवीन गुप्त चेंबर्स आढळून आले.
असे मानले जाते की, हजारो वर्षांपासून मानवाने ही ठिकाणे पाहिली नाहीत. ब्रिटिश अभियंता जॉन शे पेरिंग यांनी 1836 मध्ये पिरॅमिडचे प्रथम उत्खनन केले.
Nanded Hospital : ‘मुलीचं रक्त जातंय…’, ‘डीन’विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा
हजारो वर्षांपूर्वीच्या पिरॅमिड्सचे उत्खनन
पेरिंगला स्फोटक द्रव्ये आणि अंतर्गत संरचनांना हानी पोहोचवण्यासारख्या विध्वंसक पद्धतींचा वापर केला म्हणून ओळखले जाते. यावेळी वुर्झबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी पिरॅमिडचे सर्वेक्षण करण्याची आणि त्याची रचना जतन करण्यात मदत करण्याची योजना आखली. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Kayan : धक्कादायक! जीभ फाडून तरूणांच्या तोंडात अडकली गोळी, नेमकं काय घडलं?
साहुराचा पिरॅमिड अबुसिरच्या कब्रिस्तानमध्ये स्थित आहे, जे प्राचीन इजिप्तच्या पाचव्या राजवंशातील फिरॉनची दफनभूमी होती. अनेक प्रकारचे दगड वापरून हा पिरॅमिड बनवला आहे. तसंच, तज्ज्ञांचे असे मत आहे की जेव्हा ते पहिल्यांदा बनवले गेले तेव्हा ते दिसायला वेगळे असणार. त्याची बाहेरील बाजू गुळगुळीत धार असलेल्या चुनखडीच्या दगडांनी बनवलेली असणार.
ADVERTISEMENT