Ola-Uber ड्रायव्हरने जास्त भाडं घेतलं तर काय करायचं?

रोहिणी ठोंबरे

• 05:38 AM • 23 Aug 2023

Ola आणि Uber सारख्या कॅब सेवांचा सध्या प्रत्येकजण लाभ घेतो. किरकोळ समस्या सोडल्या तर ही एक चांगली सुविधा आहे. पण कित्येकदा यासंदर्भातील भाड्यांबाबत अनेक तक्रारी कानावर येतात. विशेषत: जेव्हा स्क्रीनवर भाडे वेगळेच दाखवले जाते आणि डेस्टिनेशनवर पोहचल्यावर ते वेगळेच दिसते. अशा परिस्थितीत आपण एकतर कॅब चालकाशी वाद घालतो किंवा चिडून पैसे देतो. पण असं जर घडलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही.

Mumbaitak
follow google news

Extra Charges From Ola and Uber : सारख्या कॅब सेवांचा सध्या प्रत्येकजण लाभ घेतो. किरकोळ समस्या सोडल्या तर ही एक चांगली सुविधा आहे. पण कित्येकदा यासंदर्भातील भाड्यांबाबत अनेक तक्रारी कानावर येतात. विशेषत: जेव्हा स्क्रीनवर भाडे वेगळेच दाखवले जाते आणि डेस्टिनेशनवर पोहचल्यावर ते वेगळेच दिसते. अशा परिस्थितीत आपण एकतर कॅब चालकाशी वाद घालतो किंवा चिडून पैसे देतो. पण असं जर घडलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही. कारण आपले पैसे वसलू करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. आज आपण याविषयी जाणून घेऊयात. (Extra Charges From Ola and Uber What You Do For Recover)

हे वाचलं का?

कॅब भाड्याचे कॅलक्युलेशन

आपण जर पाहिलं असेल की, अॅप उघडल्यावर, डेस्टिनेशन निवडताच, स्क्रीनवर एक अंदाजे भाड्याची रक्कम दिसते. पण तुम्ही स्क्रीनवर जर नीट नजर टाकली तर तिथे ‘प्राइस मे वेरी’ किंवा ‘फेअर मे वेरी’ असं स्पष्ट लिहिलेलं असतं. याचाच अर्थ असा असतो की, शेवटी आकारण्यात येणाऱ्या भाड्यात बदल होऊ शकतो. ते वर आणि खाली असू शकते.

Chandrayaan-3 Landing time : रशियाच्या चुकीतून धडा, चंद्रावर यशस्वी लँडिंगसाठी ‘कासव’चाल

असंच घडण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं की, वेटिंग टाइम, ट्रॅफिक, पत्त्यामधील बदल किंवा निर्धारित मार्गाव्यतिरिक्त इतर कोणता मार्ग. आता यापैकी काही असल्यास, भाडे किती वर किंवा खाली असेल हा तुमचा आणि अॅपमधील विषय आहे. पण सर्व काही ठीक असूनही तुम्हाला 300 ऐवजी 400 आणि 500 ​​रुपये द्यावे लागले तर, मग काय कराल?

Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!

कस्टमर केअरची घेता येते मदत

वेटिंग टाइमही नाही आणि ट्रॅफिकची समस्याही नाही, अशावेळी अॅपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. जर तुमचा मुद्दा योग्य असेल, तर राइड सुरू होण्यापूर्वी स्क्रीनवर दाखवलेली रक्कमच तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अॅपमधील राईड विभागात जाऊन तक्रार करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की, ड्रायव्हरही अॅपवरच अवलंबून असल्याने त्याच्याशी भांडू नका.

तुम्ही पैसे भरले असले तरी, ते पुन्हा रिटर्न होतात. जर जास्तीचे पैसे परत केले नाहीत तर त्याचे नेमके कारण तुम्हाला कळण्याची शक्यता आहे.

Vasai : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी निघाली अन् रस्त्यात मृत्यूनं गाठलं…भयंकर घटनेने शहर हादरलं

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी संपर्क साधा!

1800-11-4000 किंवा 8800001915 या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार नोंदवू शकता. आता तुम्हाला वाटेल ग्राहक हेल्पलाइनने काय होईल? पण, गेल्या वर्षीच एका यूजरला ओव्हरचार्ज केल्याबद्दल 95 हजारांची भरपाई मिळाली . अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रापासून वेबसाइटवर सहज उपलब्ध होतील. 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी याचा योग्य तपास करून सात हजार यूजर्सना पैसे परत मिळवून दिले होते. असे काही तुमच्या बाबतीत घडलं तर या दोन्ही पद्धती तुम्ही वापरून पाहा.

    follow whatsapp