Govt Job: अरे व्वा! SBI मध्ये होतेय मॅनेजर पदांवर भरती... पण, 'या' उमेदवारांनाच करता येणार अर्ज 

रोहिणी ठोंबरे

15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 02:29 PM)

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत सध्या मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय स्टेट बँकेत सध्या मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत सध्या मेगा भरती होत आहे. डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery या पदासाठी 187 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations या पदासाठी 412 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations या पदासाठी 80 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect या पदासाठी 27 जागा, डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security या पदासाठी 07 जागा तर, असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी 798 जागा आहेत. अशा एकूण 6 पदांवर 1,511 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे.

हे वाचलं का?

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 in state bank of india on manager posts for 1511 seats only these candidates can apply

हेही वाचा : Ganesh Visarjan 2024: बाप्पाचं विसर्जन घरीच करताय? मग थोडं थांबा...

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 1) 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.5- 1) 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT) 2) 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.6-  50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

  • पद क्र.1 ते 5- 25 ते 35 वर्षे
  • पद क्र.6- 21 ते 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ इडब्ल्यूएस/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 750 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वर क्लिक करू शकता.

    follow whatsapp