Western Railway मध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 'इतका' पगार

मुंबई तक

• 04:06 PM • 24 Sep 2024

Job Vacancy : पश्चिम रेल्वेमध्ये सध्या मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम रेल्वेमध्ये सध्या मेगा भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Recruitment 2024 : पश्चिम रेल्वेमध्ये सध्या मेगा भरती होत आहे. अप्रेंटिस पदावर एकूण 5 हजार 066 जागांसाठी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Opportunity 2024 in Western Railway know the Salary will get per month)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
  • ITI-NCVT/SCVT [(Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/Electronics Mechanic/ Wireman/Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/Plumber/Draftsman (Civil)/ Stenographer/Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)] असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Gold Rate Today: सोन्याचा भडकाच! ग्राहकांच्या खिशाला चटका... वाचा आजचे भाव एका क्लिकवर

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही आहे.

 
अधिक माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://wr.indianrailways.gov.in/?lang=1 वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसरा हप्ता लवकरच येणार खात्यात, पण 'या' महिलांना एकही रूपया मिळणार नाही

अर्जाची लिंक

https://rrc-wr.com/tradeapp/login?AspxAutoDetectCookieSupport=1

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1rDBpIeVA1JxUXFF6ewppmJlld9iClHL6/view?usp=sharing

    follow whatsapp