Kitchen Tips : बाईईई! किती काळाकुट्ट झालाय गॅस बर्नर; टेन्शन घेऊ नका, काही मिनिटातच चकाकी येईल, फक्त...

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 02:43 PM)

Kitchen Jugaad To Clean Gas Burner : प्रत्येक गृहिणीला वाटतं आपलं स्वयंपार घर स्वच्छ आणि सुंदर असावं. कारण किचनमध्ये जेवण बनवताना आजूबाजूच्या वस्तू साफ असणे अत्यंत आवश्यक असतं. किचनमध्ये गॅस हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.

Gas Burner Cleaning Jugaad

How To Clean Dirty Gas Burner

follow google news

बातम्या हायलाइट

point

काळाकुट्ट झालेला गॅस बर्नर साफ करण्याच्या सोप्या टीप्स कोणत्या?

point

गॅस बर्नर झटपट होईल साफ, फक्त या टीप्स फॉलो करा

point

गॅस बर्नर काळा होण्याची कारणे महिती आहेत का?

Kitchen Jugaad To Clean Gas Burner : प्रत्येक गृहिणीला वाटतं आपलं स्वयंपार घर स्वच्छ आणि सुंदर असावं. कारण किचनमध्ये जेवण बनवताना आजूबाजूच्या वस्तू साफ असणे अत्यंत आवश्यक असतं. किचनमध्ये गॅस हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण गॅस नसेल, तर एकही पदार्थ शिजवता येणार नाही. जरी घरात मोठा गॅस असला, तरी त्याला साफ ठेवणं, हे तितकच महत्त्वांच असतं. जेवण तयार करताना मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो. पण हे पदार्थ गॅस बर्नरवर पडल्यावर ते काळाकुट्ट बनतात. त्यामुळे किचनमध्ये अस्वच्छता निर्माण होते. (Every housewife feels that her own home is clean and beautiful. Because while preparing food in the kitchen, it is very important to keep the surrounding items clean)

हे वाचलं का?

बर्नर काळे पडल्यावर गॅसचा प्रवाह तर कमी होतोच, पण त्या बर्नरला दुर्गंधही येते. ज्या महिलांच्या किचनमध्ये गॅसचे बर्नर काळे पडले आहेत किंवा त्यांना डाग लागले आहेत, अशा महिलांसाठी आम्ही एकदम सोप्या टीप्स सांगणार आहोत. भारतीय किचनमध्ये गॅस एक महत्त्वाचं उपकरण आहे. याशिवाय आम्ही जेवण शिजवू शकत नाही. जेवण शिजवताना अनेकदा बर्नरवर तेल किंवा ग्रेव्ही पडते. त्यामुळे बर्नर खराब होतात. जर बर्नर खूप खराब झाले, तर त्यातून आगीची फ्लेम बाहेर पडणंही बंद होतं. अशातच गॅस स्टोव्हच्या बर्नरला साफ करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला गॅसच्या बर्नरला साफ करण्याचे दोन सोपे उपाय सांगणार आहोत.

हे ही वाचा >>  Sanjay Raut: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार? नेमकं प्रकरण काय?

'असा' करा गरम पाणी, लिंबू आणि इनोचा वापर

लिंबू डाग साफ करण्याचा एक जबरदस्त घरगुती उपाय आहे. इनोही खराब झालेल्या वस्तूंना झटपट साफ करतं. यासाठी तुम्हाला एका भांड्यात गरम पाणी घ्यावं लागेल. त्या पाण्यात लिंबू पिळून टाका. यानंतर इनो फ्रूट सॉल्ट टाका. आता या मिश्रणात बर्नरला कमीत कमी दोन तास भिजवून ठेवा. दोन तासानंतर बर्नरला डिश वॉशिंग लिक्विड किंवा साबणाच्या मदतीनं जुन्या टूथब्रशने घासावं लागेल.

तुम्ही मेटल स्क्रबचाही वापर करू शकता. आता बर्नरला सुकवा आणि साफ करा. पाणि आणि विनेगरचा वापर करूनही बर्नरला साफ करता येतं. यासाठी एका भांड्यात पाणी आणि विनेगार मिक्स करून घ्या. आता त्यात बेकिंग सोडा मिक्स करा आणि बर्नरला एक ते दोन तास भिजवून ठेवा. दोन तासानंतर बर्नरला बाहेर काढा आणि डिश वॉशिंग लिक्विड घेऊन जुन्या टूथब्रशने स्क्रब करा. आता दोन्ही बर्नर पुसून सुकवा आणि त्याचा वापर करा.

    follow whatsapp