Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचे अर्ज मंजूर, पण बँकेत किती पैसे येणार?

मुंबई तक

27 Sep 2024 (अपडेटेड: 27 Sep 2024, 08:19 PM)

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तिसऱ्या टप्प्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले आहेत. या दरम्यान ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते. त्या महिलांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत.

ladki bahin yojana scheme those women filled application saptember they will get benefit in same month

सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज झाले मंजूर

follow google news

बातम्या हायलाइट

point

सप्टेंबर महिन्याचेही अर्ज झाले मंजूर

point

महिलांच्या खात्याच याच महिन्यात येणार पैसे

point

किती पैसे खात्यात होणार जमा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तिसऱ्या टप्प्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रूपये जमा झाले आहेत. या दरम्यान ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते. त्या महिलांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत. मात्र या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme those women filled application saptember they will get benefit in same month) 

हे वाचलं का?

ज्या महिलांचे अर्ज हे 31 जुलैआधी मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रूपये जमा झाले होते. आता या महिलांना सप्टेंबर महिन्याचा लाभ येणार आहे. येत्या 29 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात पैसा जमा होणे बाकी आहे. 

हे ही वाचा : ठाकरेंची 'या' निवडणुकीत बाजी, भाजपला दिला धोबीपछाड

आता ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज करता आले नव्हते, आणि त्या महिलांचे अर्ज हे ऑगस्टमध्ये मंजूर झाले होते. अशा महिलांच्या खात्यात आता सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. अनेकांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. तर येत्या 29 तारखेपर्यंत काही महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. 

अर्जाची मुदत 31 ऑगस्टला संपूष्ठात आल्यानंतर सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत योजनेला मुदतवाढ दिली होती. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टची डेडलाईन हुकलेल्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरायला सुरूवात केली होती. या दरम्यान सरकारने अर्ज भरलेल्या उमेदवाराला गुडन्यूज दिली होती. सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना त्याच महिन्यात लाभ मिळणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये अर्ज भरून मंजूर झालेल्या उमेदवारांच्या खात्यात लाडकी बहीणचे 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात येत्या 29 सप्टेंबरपर्यंत 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

    follow whatsapp