Govt Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत 'ऑफिसर' पदांसाठी नोकरीची संधी, लगेच करा अर्ज!

रोहिणी ठोंबरे

• 06:36 PM • 25 Jul 2024

RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) सरकारी नोकरीची संधी आहे.  ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल या पदासाठी 66 जागा, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR या पदासाठी 21 जागा, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM या पदासाठी 07 जागा अशा एकूण तीन पदांवर 94 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Reserve Bank of India Job Opportunity for Officer B Grade Posts Apply Now)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

  • पद क्र.2: अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
  • पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics & Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1 हजार 03 रूपये शुल्क जात आहे. 

  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 118 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?

 

अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्जाची लिंक

https://ibpsonline.ibps.in/rbiojun24/

हेही वाचा : Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावर लढणार.. भाजपसोबत युती नाही!

 

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1lzSqU1bOCE81YjjJky1MrZQ92SnX6b-T/view?usp=sharing

    follow whatsapp