Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात (Bank Account) तिसरा हप्ता (Third Installment) जमा होणार आहे. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या दिवसाला अवघे दोन-चार दिवस उरले आहे. त्यामुळे तिसरा हप्ता खात्यात येण्यापुर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला योजनेच्या पैसे गमावून बसावे लागतील.त्यामुळे नेमकं काय करायचं आहे, ते जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme women will get benefit of third installement mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)
ADVERTISEMENT
तुम्ही अर्ज केला असेलच आणि तो मंजूर देखील झाला असेल. पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. यामागचे कारण म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासोबत आणखीण अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. ज्या खूप महत्वाच्या आहेत.
जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्यावेळेस आपण अर्ज करतो, त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतोय. यासोबतच बँक तपशील देखील जोडतो. या सगळ्या गोष्टी भरत असताना अर्जाच्या व्यतिरीक्त काही गोष्टी आपल्याला आणखीण कराव्या लागतात. त्या गोष्टी म्हणजे, तुमच्या आधारकार्डशी मोबईल नंबर जोडलेला असणे. तसेच तुमच्या आधारकार्डशी तुमचं चालू बँक खाते जोडलेले असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही अर्जात भरलेले बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच येणार नाहीयेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : नारी शक्ती App आणि वेबसाईट झाली बंद, महिलांनी आता करायचं काय?
जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तसेच तुमचे जूने अकाऊंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाऊंट अॅड करता येणार आहे. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
बँक अकाऊंट सोबत तुमचा मोबाईल नंबरही झटक्यात आधारशी लिंक करता येतो. कोणत्याही आधार सेंटवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक होणार आहे. फक्त लिंक होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे ही दोन काम तुमची झाली की तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करणार
दरम्यान राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये सांगितले होते. तसेच आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' दिवशी 4500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार?
गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT