Budget 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारमन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Scheme) ही यापैकी एक आहे. या योजनेंतर्गत महिलांची संख्या 2 कोटींवरून 3 कोटी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी ही संख्या 2 कोटी होती. (How Women Can apply to avail the benefits of Lakhpati Didi Scheme)
ADVERTISEMENT
या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. 83 लाख बचत गटांनी मिळून देशातील 9 कोटी महिलांचे जीवन बदलले आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी झाल्या आहेत.
वाचा : मराठा आरक्षणावरून शिंदे गट पेटला, भुजबळांवर खालच्या पातळीवर टीका
काय आहे लखपती दीदी योजना?
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत लखपती दीदी योजनेचा उद्देश महिलांना सूक्ष्म रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. या योजनेंतर्गत महिलांना उद्योग, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी छोटे कर्ज दिले जातात.
लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना प्रशिक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 2023 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशभरातील खेड्यातील 20 दशलक्ष महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना स्वयं-सहायता गटांमध्ये प्रशिक्षित करणे आणि त्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष किमान 1 लाख रुपये उत्पन्न मिळविण्यास सक्षम करणे हा आहे. या योजनेंतर्गत महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्त करणे इत्यादी कामांचे प्रशिक्षण दिले जाते.
ADVERTISEMENT