Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांना मिळणार मोठा दिलासा

मुंबई तक

02 Aug 2024 (अपडेटेड: 02 Aug 2024, 10:30 PM)

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : महिलांच्या मराठीतील अर्जाच्या प्रकरणावर आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता यावर सरकारची भूमिका मांडली आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.

ladki bahin yojana big relief for that applicant who fill marathi language form mukhyamantri ladki bahin yojana aditi tatkare eknath shinde

मराठीतून अर्ज भरलेल्या महिलांना मोठा धक्का बसला होता.

follow google news

बातम्या हायलाइट

point

असंख्य महिलांनी मराठीतून अर्ज भरले होते.

point

मराठीतील अर्ज रद्द ठरवले जातील असे वृत्त झळकले होते

point

महिलांना मोठा धक्का बसला होता.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून महिलांची अर्ज भरण्यास झुंबड उडाली होती. मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेचे अर्ज भरले होते. त्यातील ग्रामीण भागातील असंख्य महिलांनी मराठीतून अर्ज भरले होते. पण माध्यमांमध्ये मराठीतील अर्ज रद्द ठरवले जातील असे वृत्त झळकले होते. त्यामुळे मराठीतून अर्ज भरलेल्या महिलांना मोठा धक्का बसला होता. मात्र त्या महिला अर्जदारांना आता सरकारने दिलासा दिला आहे. (ladki bahin yojana big relief for that applicant who fill marathi language form mukhyamantri ladki bahin yojana aditi tatkare eknath shinde) 

हे वाचलं का?

महिलांच्या मराठीतील अर्जाच्या प्रकरणावर आता  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता यावर सरकारची भूमिका मांडली आहे. 
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत.कृपया कोणीही या बाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी महिलांना केले आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. 

हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024: उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव, भाजपला आणणार अडचणीत?

आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून भूमिका मांडली. ''बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने असंख्य महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. हे अर्ज भरताना अर्थातच मराठीला प्राधान्य दिलं गेलं होतं. नारी शक्ती दुत अॅपवर सुद्धा मराठीचा पर्याय देण्यात आल्यामुळे महिलांनी आपली मातृभाषा मराठीतूनच अर्ज भरण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे ज्या महिलांनी मराठीतून अर्ज केले होते. त्यांचे अर्ज बाद ठरतील असे वृत्त अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. 

हे ही वाचा : Satara Crime : प्रेयसीला आधी घरात बोलावलं, नंतर बिल्डिंगवरुन खाली ढकललं..., प्रियकराने का केली हत्या?

खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाने एक परिपत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी मराठीतून भरलेले अर्ज रद्द केले जातील असा सूचना केल्या होत्या. त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता. या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकताच आता सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

    follow whatsapp