Ladki Bahin Yojana : महिलांनो, उरली शेवटची संधी!...तर एकही रूपया खात्यात येणार नाही?

मुंबई तक

• 06:34 PM • 15 Oct 2024

Mukhymantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. जर ही संधी महिलांकडून हुकली तर त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही आहे.

ladki bahin yojana last date for application mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme  these women did not get money

आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

योजनेत अर्ज करण्याची मुदत संपली

point

अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

point

योजनेचे पैसे मिळणार नाही

Mukhymantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. जर ही संधी महिलांकडून हुकली तर त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही आहे. आणि त्या महिलांना योजनेच्या लाभापासुन वंचित राहावे लागणार आहे. (ladki bahin yojana last date for application mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme  these women did not get money)  

हे वाचलं का?

खरं तर लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरला संपल्यानंतर सरकारने काही दिवस मुदतच वाढवली नव्हती. मात्र अद्याप अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने पुन्हा अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे महिलांजवळ मोजून 4 ते 5 दिवसच अर्ज करण्याची संधी होती. या कालावधीत ज्यांनी अर्ज केले होते. त्याच महिला या योजनेस पात्र ठरणार आहे. आणि ज्या महिला 15 ऑक्टोबरपर्यंतही अर्ज सादर करू शकल्या नाही आहेत. त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.

हे ही वाचा :  Ladki Bahin Yojana: 'त्या' महिलांनाच मिळणार दिवाळी गिफ्ट! लाडक्या बहिणींच्या खात्यात किती रुपये जमा होणार?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेची ही शेवटची मुदतवाढ असणार आहे. कारण आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. आणि आचारसंहिताही लागली आहे. त्यामुळे सरकार पुन्हा मुदतवाढ देणार नाही आहे. राहिली गोष्ट योजनेच्या पैशाची तर जे अर्ज उद्यापर्यंत मंजूर होतील त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बाकी इतर महिलांना या योजनेच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.

किती महिलांना मिळाला लाभ? 

  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे.  2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे. 

    follow whatsapp