Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर पार पडला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांनी आताच बँक खाते चेक करायला सुरूवात करा. (ladki bahin yojana scheme 3000 rs deposite today dbt transfer mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यात आज (दि. 31) जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यासाठीचे एकूण 3 हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या संदर्भातला दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज नागपूरमध्ये पार पडला आहे.त्यामुळे आता महिलांच्या खात्यात हळुहळू पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे.
हे ही वाचा : Beef Carrying Man Assaulted : 'गोमांस आणतो काय...' मांस पाहून वृद्धाला ट्रेनमध्येच भीषण मारहाण; Video व्हायरल
52 लाख महिलांना मिळणार लाभ
ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आताच खाते तपासायला सुरूवात करा. जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे.
17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT