Mumbai News : मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागली होती. पालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली सांगितले. ईडीचं कार्यालयही याच इमारतीत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीमघ्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ADVERTISEMENT
रात्री अडीच वाजता अग्निशमन दलाला फोन
अनेक मोठ्या राजकारणी आणि व्यावसायिकांविरुद्धच्या खटल्यांच्या चौकशीशी संबंधित कागदपत्रे या कार्यालयात आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहाटे 2:30 वाजता, अग्निशमन दलाला करिमभोय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा >> "चलो काश्मीर..." अभिनेता अतुल कुलकर्णीचा काश्मीर दौरा, अर्थ काय?
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने पहाटे 3:30 च्या सुमारास आग लेव्हल-2 पर्यंत गेल्याचं सांगितलं. अशी आग म्हणजे सामान्यतः मोठी आग मानली जाते.
ईडी कार्यालयातील कागदपत्र जळाले की वाचले?
महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, पाच मजली असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग गेलेली होती. घटनास्थळी आठ अग्निशमन गाड्या, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासोच्छवास उपकरणांची व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि 108 सेवेतील एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. आगीचं कारण अद्याप कळलेले नाही. तसंच ईडी कार्यालयातील कागदपत्र जळालेत का हे पाहणं महत्वाचं असेल.
ADVERTISEMENT
