'चौकीदार जबाबदार, सिंधूचं पाणी तर...' स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा थेट PM मोदींवर हल्ला

पहलगाममधील भ्याड हल्ल्यावर सोशल मीडियावरील मोठमोठ्या लोकांचे विधान व्हायरल होत आहेत. यादरम्यान, सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिषपीठाधिश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विधान केल्याचे दिसून आले आहे.

पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं मोठं विधान

पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं मोठं विधान

मुंबई तक

27 Apr 2025 (अपडेटेड: 27 Apr 2025, 11:03 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यावरील लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

point

पहलगाम हल्ल्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचं विधान

point

काय म्हणाले स्वामी अविमुक्तेश्वरानंद?

Swami Avimukteshwarananda on Pahalgam Attack: 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाणारी पहलगामची सुंदर दरी त्या दिवशी रक्ताने माखली होती. दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले होते आणि नंतर त्यांच्यावर काही विचार न करता गोळ्या झाडल्या. या घटनेनंतरच भारत सरकारने सुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या भ्याड हल्ल्यावर सोशल मीडियावरील मोठमोठ्या लोकांचे विधान व्हायरल होत आहेत. काहींच्या मते, सुरक्षा व्यवस्थेला दोषी ठरवले तर काहींनी सरकारकडून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

यादरम्यान, सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जगद्गुरू शंकराचार्य ज्योतिषपीठाधिश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विधान केल्याचे दिसून आले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या मोठ्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. तसेच, 26 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही एक वेगळे विधान केले होते आणि यामुळे ते देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची सरकारवर टीका 

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, "आमच्या घरात कोणतीही घटना घडली तर आपण सर्वात आधी पहारेकऱ्याला जबाबदार ठरवतो आणि त्यालाच विचारतो की ती घटना कशी घडली. त्याचप्रमाणे, हल्ले रोखण्याची जबाबदारीही सुरक्षा विभागावर होती. मात्र, या हल्ल्यानंतर, पहारेकऱ्यांची भूमिका काय होती?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्यावेळी तिथे कोणताही संघर्ष किंवा युद्ध झालं नाही आणि हल्लेखोरांना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. हल्लेखोर आले, हल्ला केला आणि आरामात परत गेले."

हे ही वाचा: पहलगाम हल्ल्याचा दुसरा Video आला समोर, पाहा नराधमांनी कसा केला पयर्टकांवर हल्ला!

दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, हे कसं कळलं? 

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले, "सरकारच्या म्हणण्यानुसार दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते. पण, प्रश्न असा आहे की जर ही माहिती इतक्या लवकर मिळू शकते, तर हल्ल्यापूर्वी त्याबद्दल काहीच माहिती का नव्हती? यातून सूडाची भावना दिसत आहे."

सिंधु नदीचं पाणी थांबवलं तर ते कुठे जाईल?

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रत्येक विधानावर सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सिंधू पाणी करार रद्द करण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्यांचे म्हणणं मांडलं, "आम्ही सिंधू नदीचं पाणी थांबवू पण, तुमच्याकडे पाणी थांबवण्याचा किंवा ते वळवण्याचा आणि ते तुमच्या स्वतःच्या देशात ठेवण्याचा कोणताही पर्याय नाही." ते म्हणाले, "आम्ही विशेषज्ञांना देखील प्रश्न विचारला की, सिंधु नदीचं पाणी पाकिस्तानात जाण्यापासून थांबवण्यासाठी आपल्याकडे काय व्यवस्था आहेत? विशेषज्ञांच्या मते, आपल्याकडे आता अशी कोणतीही व्यवस्था नाही पण जर आपण आजपासून सुरुवात केली तर आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. मात्र, त्याचा किती खर्च येईल हे विचारूच नका."

हे ही वाचा: दारू पिताना किरकोळ वाद झाला, पुण्यात टोळक्यानं 60 वर्षाच्या वृद्धाला थेट... आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पीयूष गोयल यांचं विधान

26 एप्रिल रोजी पियुष गोयल यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी बोलताना पहलगाम हल्ल्याची जबाबदारी जनतेची असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, "जोपर्यंत देशातील 140 कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानत नाहीत, तोपर्यंत पहलगाममधील हल्ल्यासारख्या घटना घडतच राहतील." यावर सुप्रिया श्रीनेत यांनीही खिल्ली उडवली आणि म्हणाल्या, "याचा अर्थ सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींसाठी लोक जबाबदार आहेत का?" या विधानानंतर विरोधकांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

    follow whatsapp