Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! तिसऱ्या हप्त्यात 4500 खात्यात होणार डिपॉझिट; उरले इतकेच दिवस...

मुंबई तक

23 Sep 2024 (अपडेटेड: 23 Sep 2024, 05:18 PM)

Aditi Tatkare Third Installment Date :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवरकच जमा होईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आली नव्हती. मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगितली आहे.

ladki bahin yojana scheme aditi tatkare declare third installement date mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar

आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगितली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली

point

आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

point

'या' दिवशी खात्यात पैसे जमा होणार

Aditi Tatkare Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवरकच जमा होईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आली नव्हती. मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगितली आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचा निधी येत्या 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. (ladki bahin yojana scheme aditi tatkare declare third installement date mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar) 

हे वाचलं का?

लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना तिसऱ्या हप्त्यासाठी आणखीण 6 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँक खात्यात 4500 जमाच झाले नाही! महिलांनो, कुठे कराल तक्रार?

आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी तिसऱ्या हप्ताबाबत माध्यमांना माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी पहिला हप्त्यात आपण 1 कोटी 7 लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. आता येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 ऑगस्टला जमा होणार आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : ...तर 4500 हातातून गमावून बसाल, 'ही' चूक आताच टाळा

तिसऱ्या हप्त्यात कुणाला पैसे मिळणार? 

तिसऱ्या हप्त्यात कुणाला पैसे मिळणार? आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे? याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्याच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

    follow whatsapp