Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी जमा होणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे

मुंबई तक

25 Sep 2024 (अपडेटेड: 25 Sep 2024, 12:12 PM)

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसै जमा झाले नाहीत.

Ladki Bahin Yojana Event In Raigad

Ladki Bahin Yojana Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसै बँक खात्यात कधी जमा होणार?

point

'या' दिवशी रायगडमध्ये होणार लाडकी बहीण योजनेचा भव्य कार्यक्रम

point

...तरच महिलांना मिळतील योजनेचे 1500 आणि 4500 रुपये

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसै जमा झाले नाहीत, अशीही माहिती आहे. पण आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागली आहे. तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार? असा सवाल महिलांना पडला आहे. परंतु, महिलांना आता कसंलही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण या योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. यावेळी महिलांच्या खात्यात 1500 आणि 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. (the Chief Minister Ladki Bahin Yojana, money has been deposited by the government in the accounts of eligible women in the first and second weeks. Money has still not been deposited in the accounts of some women)

हे वाचलं का?

सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यात सुरुवात करावी.

हे ही वाचा >>'...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला', भाजप आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, Video प्रचंड व्हायरल

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नुकतीच मोठी घोषणा केली. 'तिसऱ्या हप्त्यात काही तांत्रिक बाबीमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत जे अर्ज दाखल झाले असतील, त्यांना डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. 

ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्याच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    follow whatsapp