Ladki Bahin Yojana : महिलांनो, उरली शेवटची संधी...7500 आणि 3000 खात्यात कधी जमा होणार?

मुंबई तक

10 Oct 2024 (अपडेटेड: 10 Oct 2024, 02:27 PM)

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत पाच महिन्याच्या योजनेचे पैसे 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सूरूच आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यात आता महिलांजवळ शेवटची संधी उरली आहे.

ladki bahin yojana scheme forth and fifth installment not deposite women bank account now what to do read full artical

...तर महिलांना मोठा धक्का बसणार आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

चौथा आणि पाचवा हप्ता जमा होण्याची शेवटची संधी

point

पैसे जमा होण्याची शेवटची तारीख

point

पैसे जमा झाले नाही तर महिलांना धक्का बसणार

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत पाच महिन्याच्या योजनेचे पैसे 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सूरूच आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यात आता महिलांजवळ शेवटची संधी उरली आहे. कारण आता 7500 आणि 3000 खात्यात जमा होण्याची अंतिम तारीख समोर आली आहे. या तारखेपर्यंत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, तर त्यांना मोठा धक्का बसणार आहे.  (ladki bahin yojana scheme forth and fifth installment not deposite women bank account now what to do read full artical) 

हे वाचलं का?

ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित मिळून 4500 जमा झाले होते. त्या महिलांच्या खात्यात आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे एकत्रित पणे 3000 रूपये जमा होणार आहे. यासह जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रूपयाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यात त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले होते. आता या महिलांच्या खात्यात देखील ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित मिळून 3000 जमा होणार आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Weather: 'हीट'च्या तडाख्यातून नागरिकांना थोडा दिलासा! पावसामुळे राज्यात थंडावा वाढणार?

7500 कुणाच्या खात्यात येणार? 

तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत.पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यांच्या खात्यात आता जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7500  रूपये जमा होणार आहेत. 

आता काही महिलांच्या खात्यात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा देखील झाले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत.  हे पैसे 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आज महिलांकडे हे पैसे जमा होण्याची शेवटची संधी असणार आहे. आज जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्यांना दिलासा मिळणार आहे, आणि जर पैसे खात्यात आलेच नाही, तर धक्का बसण्याची शक्यता आहे. 

 दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. 

    follow whatsapp