Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवसापासून 4500 थेट खात्यात येणार?

मुंबई तक

• 02:22 PM • 20 Sep 2024

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा (Third Installment) लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे.आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात (Women Bank Account) तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा आता संपली आहे.

तिसऱ्या हप्त्यात पैसे मिळायला सुरूवात होणार

ladki bahin yojana scheme third installment amount deposite from today on womens bank account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिसऱ्या हप्त्याचे पैसे आजपासून होणार जमा

point

सलग तीन दिवस योजनेचे पैसे पाठविण्यात येणार

point

महिलांनी आजपासून त्यांचे खाते तपासून घ्यावे

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा (Third Installment) लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे.आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात (Women Bank Account) तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा आता संपली आहे. आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत? तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे? त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरूवात करा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल. (ladki bahin yojana scheme third installment amount deposite from today on womens bank account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)  

हे वाचलं का?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातील समोर आली होती. मात्र या तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते. त्यानंतर आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरूवात करा. पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500  जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Gold Price Today: दिवसा दुप्पट, रात्री चौप्पट! सोन्याचे भाव बघूनच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या; पाहा आजचे दर...

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत. 

मग 3500 कुणाला मिळणार? 

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. 

ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ 

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत,असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : Tirupati Balaji: तिरूपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावराची चरबी, सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले, 'मला तर...'

'इतक्या' महिला ठरल्या लाभार्थी 

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

    follow whatsapp