Astro: नैना ही (काल्पनिक नाव) एक हुशार विद्यार्थिनी होती. मात्र, परीक्षेची वेळ जवळ येताच ती घाबरू लागली. तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि शिकवलेल्या गोष्टी विसरत असल्यामुळे तिला खूपच ताण जाणवत होता. हे पाहून तिचे आई-वडील काळजीत पडले.
ADVERTISEMENT
यादरम्यान, कुणीतरी नैनाच्या आईला ज्योतिषाचा सल्ला घेण्याचं सुचवलं. सुरुवातीला तिला ही सगळी मस्करी वाटली. मात्र, नैनाच्या मानसिक स्थितीमुळे तिला खूपच चिंता वाटत असल्यामुळे त्यांनी ज्योतिषांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याचा ठरवलं.
त्यावेळी ज्योतिषी म्हणाले, "मुलांच्या शिक्षणावर त्यांच्या ग्रहांचा खोलवर परिणाम होतो. चंद्र ग्रह मनावर, बुधचा बुद्धीवर आणि सूर्य ग्रहाचा एकाग्रता तसेच आरोग्यावर प्रभाव पडतो. जर हे ग्रह नियंत्रणात म्हणजेच संतुलित असतील तर मुलांना अभ्यासात यश मिळू शकते."
हे ही वाचा: घरात लागतं भांड्याला भांडं! प्रत्येक वेळी नुसतीच भांडणं..काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
याविषयी सुप्रसिद्ध ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी काय सांगितलंय? परीक्षेच्या वेळी मुलांची काळजी कशी घ्यावी? शिक्षणाचा ग्रहांशी काय संबंध आहे? आणि तुमच्या मुलाला अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी कोणते उपाय करता येतील? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
मुलांच्या अभ्यासावर ग्रहांचा प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, काही ग्रहांचा मुलांच्या शिक्षणावर आणि जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. मनाचा स्वामी चंद्र ग्रह जन्मल्यापासून 12 वर्षांपर्यंत मुलांच्या जीवनावर नियंत्रण ठेवतो. या ग्रहाचा अभ्यासावर आणि मानसिक पातळीवर परिणाम होतो. यानंतर, किशोरावस्थेत बुद्धाचा (बुध ग्रह) प्रभाव वाढतो. हा ग्रह बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती नियंत्रित करतो. तर, सूर्य ग्रह मुलांच्या आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी कारणीभूत असतो. मुलांच्या अभ्यासात यश मिळविण्यासाठी चंद्र, सूर्य आणि बुध या तीन ग्रहांचे संतुलन आवश्यक आहे. याशिवाय, आहार आणि घरातील वातावरणाचाही मुलाच्या अभ्यासावर परिणाम होतो.
अभ्यासात एकग्रता वाढवण्यासाठी टिप्स
जर तुमचे मूल अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसेल, तर काही सोपे उपाय करा:
अभ्यासाचे ठिकाण: मुलासाठी एक निश्चित अभ्यासाचे ठिकाण ठरवा, ज्याठिकाणी तो दररोज अभ्यास करू शकेल. वारंवार जागा बदलणे टाळा.
चंदनाचा सुगंध: सकाळी आणि संध्याकाळी अभ्यासाच्या ठिकाणी चंदनाचा धूप जाळा. धूर निघून गेल्यानंतरही सुगंध तसाच राहिला पाहिजे.
प्रकाशाकडे लक्ष द्या: तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असल्याची खात्री करा. प्रकाशामुळे सेरोटोनिन हार्मोन वाढते यामुळे मन आनंदी आणि एकाग्र राहते.
भगवान श्रीकृष्णाचे चित्र: अभ्यासाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे एक चित्र किंवा छोटी मूर्ती ठेवा, यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल.
पालकांची वागणूक
मुलांना शिकवताना पालकांनी संयम बाळगला पाहिजे. मुलाला शिव्या देणे किंवा दबाव आणणे टाळा. त्याचे मनोबल वाढवा, त्याची स्तुती करा आणि शांत मनाने त्याला मदत करा. परीक्षेच्या काळात मुलाला भावनिक आधाराची सर्वात जास्त गरज असते.
स्मरणशक्ती सुधारण्याचे मार्ग
अनेक मुले अभ्यास करतात पण नेमकं परीक्षेच्या वेळी ते विसरतात. यासाठी खालील उपाय करा:
गायत्री मंत्र: तुमच्या मुलाला दररोज सकाळी 9 ते 27 वेळा गायत्री मंत्राचा जप करण्याची सवय लावा.
चंदनाचा टिळा: कपाळावर किंवा घशावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
आहार: एकाच वेळी खूप जास्त पदार्थ खाण्यासाठी देऊ नका. मेंदूसाठी फायदेशीर असलेले अक्रोड खायला द्या.
परीक्षेची भीती दूर करा
जर मुलाला परीक्षेची भीती वाटत असेल किंवा तो घाबरत असल्यास खालील उपाय करा:
सूर्याला नमस्कार: सकाळी आंघोळ केल्यानंतर तुमच्या मुलाला 1 मिनिट सूर्याला नमस्कार करण्याची सवय लावा.
पेन्सिल बॉक्सचा रंग: पिवळा किंवा हिरवा रंगाचा पेन्सिल बॉक्स द्या.
चंदनाच्या सुगंधाचा रुमाल: मुलाला असा रुमाल द्या ज्यामध्ये हलका चंदनाचा सुगंध असेल.
अन्न आणि पर्यावरणाची काळजी घ्या
मुलाला बर्गर, पिझ्झा यासारख्या फास्ट फूडपासून दूर ठेवा. या गोष्टी मनाला चंचल बनवतात. त्याऐवजी केळी, हिरव्या भाज्या आणि खिचडीसारखे हलके अन्न खायला द्या.
मुलाला दिवसातून एकदा एक छोटीशी प्रार्थना करायला लावा, जसे की "मला आयुष्यात यश दे आणि तुझे आशीर्वाद माझ्यावर ठेव."
परीक्षेच्या अगदी आधी नवीन रत्न घालू नका, त्यामुळे मानसिक बदल होऊ शकतात.
हे ही वाचा: Astro: तुमची रास कोणती? पाहा तुम्ही मालामाल होणार आहात का, अचूक आणि बिनतोड उपाय
पालकांसाठी सल्ला
मुलावर जास्त दबाव आणू नका. मुलाला फक्त कठोर परिश्रम करायला आणि परीक्षा देण्यास सांगा आणि निकालाची काळजी करू नका.
ADVERTISEMENT
