Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत नुकतीच सरकारने वाढवली आहे. त्यामुळे आता महिलांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. काहींसाठी हा दिलासा असला तरी काही महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे. कारण त्या महिलांना 3000 रूपये गमावून बसावे लागणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांना हा धक्का बसणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana the women loose 3000 rupees installment mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis)
ADVERTISEMENT
खरं तर लाडकी बहीण योजनेची मुदत ही 31 ऑगस्टला संपुष्टात आली होती. या मुदतीनंतर देखील अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता आला नव्हता. त्यामुळे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने योजनेची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.पण ही मुदत वाढवताना सरकारने एक अट घातली होती,ज्याचा महिलांना फटका बसणार आहे. ती अट म्हणजे सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबरचाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे.
हे ही वाचा : Inside Story: 10 दिवस, 288 जागा! महायुतीचा जागावाटपाचा प्रश्न सुटेल का?
3000 रूपये गमवावे लागणार
ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे, त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते, तर त्यांना 3000 रूपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते.
1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे.
तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT