Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: लाडकी बहीण योजना अर्जाची शेवटची तारीख आली जवळ, हमीपत्र PDF डाऊनलोड केलं का?

मुंबई तक

• 09:57 PM • 13 Aug 2024

Maharashtra Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf 2024: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख जवळ आली असून त्यासाठी सर्वात आवश्यक असलेले हमीपत्र फॉर्मचा पीडीएफ जरूर डाऊनलोड करा.

हमीपत्र PDF डाऊनलोड केलं का?

हमीपत्र PDF डाऊनलोड केलं का?

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली जवळ

point

माझी लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र आवश्यक

point

माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्राची PDF करा डाऊनलोड

Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf Download: मुंबई: माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करत आहेत. आता अर्जाची शेवटची तारीख देखील जवळ आली आहे. 31 ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अशावेळी या अर्जासोबत जे हमीपत्र द्यावं लागणार आहे ते तुम्ही डाऊनलोड करणं गरजेचं आहे. ते नेमकं कसं करायचं याचबाबत आम्ही आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत. (mukhyamantri majhi ladki bahin yojana application last date 31 august 2024 do you download the hamipatra pdf)

हे वाचलं का?


माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत शिंदे सरकार हे राज्यातील महिलांना दरमहा 1500 सरकार देणार आहे. याच योजनेसाठी अर्जासोबत हमीपत्र नावाचा एक विशेष फॉर्म देखील भरून द्यावा लागणारआहे. हा फॉर्म कसा मिळवायचा, हमीपत्र पीडीएफ कसं भरायचं आणि याबाबत सविस्तरपणे जाणून घ्या. 

काय आहे माझी लाडकी बहीण योजना?

महाराष्ट्रातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने 'माझी लाडकी बहीण' ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये एका कुटुंबातील दोन महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. ज्या महिला किंवा त्यांचं कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना या आर्थिक मदतीद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे

माझी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते पात्रता निकष? 

निकष

अट
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

 माझी बहीण योजनेचा लाभ हवा असल्यास अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

आयकर स्थिती

कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.

रोजगार स्थिती

अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित/कायम कर्मचारी नसावा.

इतर आर्थिक योजना

1500 रु. पेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ अर्जदार महिलेला घेतलेला नसावा किंवा घेत नसावी.

राजकीय सहभाग

कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा.

जमिनीची मालकी

कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी.

वाहनाची मालकी

अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत नसावी.

 

    follow whatsapp