MHADA Website: 1 मिनिट... 'ही' आहे MHADA ची खरी Website, नाहीतर गमावून बसाल हजारो रुपये!

मुंबई तक

14 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 12:04 AM)

MHADA Website Cyber Crime: म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटची कॉपी करून एक बनावट वेबसाईट तयार करुन काही अज्ञात सायबर चोरांनी सामान्य लोकांची हजारो रुपयांची लूट केली आहे.

1 मिनिट... 'ही' आहे MHADA ची खरी Website, नाहीतर गमावून बसाल हजारो रुपये!

1 मिनिट... 'ही' आहे MHADA ची खरी Website, नाहीतर गमावून बसाल हजारो रुपये!

follow google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडाची बनावट वेबसाइट बनवून अनेकांची फसवणूक

point

म्हाडाने दाखल केली तक्रार

point

बनावट वेबसाइटमुळे सामन्यांनी गमावले हजारो रुपये

MHADA Website: मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MHADA) अधिकृत वेबसाइट https://mhada.gov.in सारखीच एक बनावट वेबसाइट तयार करण्यात आली असून या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून काही लोकांची हजारो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी आता म्हाडाने सायबर सेलमध्ये अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (mumbai house dream know which is the real website of mhada thousands of rupees looted by cyber thieves from fake website)

हे वाचलं का?

नुकतीच म्हाडाने मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील 2030 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केली होती. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुकांना सावध केले आहे की, लॉटरीत सहभागी होण्यासाठी केवळ म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वापरावी. जे लोक योग्यरित्या अर्ज करतात तेच लॉटरीत सहभागी होऊ शकतात.

हे ही वाचा>> MHADA Lottery 2024: उरले फक्त काही तास! मुंबईतील घराचं स्वप्न होणार साकार; असा करा अर्ज

या संगणकीय सोडतीद्वारेच म्हाडाच्या सदनिकांचे वाटप केले जाते. याशिवाय म्हाडाच्या सदनिका देता येईल असा दुसरा मार्ग नाही. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले.

नेमकं प्रकरण काय?

काही अज्ञात लोकांनी mhada.org या नावाने बनावट वेबसाइट तयार केली आहे. जी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://mhada.gov.in सारखी दिसते. या बनावट वेबसाईटचे पहिले पेज, पत्ता आणि डिझाईन हुबेहूब म्हाडाच्या खऱ्या वेबसाइटप्रमाणं दिसतं. परंतु, या बनावट वेबसाइटवर अर्ज करण्याचा कोणताही मार्ग नसून थेट पैसे जमा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 

या अज्ञात लोकांनी पीडितांना म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन देऊन या बनावट वेबसाइटवर 50 हजार रुपये ऑनलाइन जमा केले. यासोबतच या बनावट वेबसाइटवरून बनावट पावतीही देण्यात आली होती.

म्हाडाच्या लॉटरीसाठी IHLMS 2.0 नावाची सुरक्षित आणि सोपी संगणक प्रणाली वापरली जाते. या प्रणालीद्वारे, अर्जदारांची नोंदणी केली जाते आणि त्यांची कागदपत्रे अपलोड केली जातात. या दस्तऐवजांची पडताळणी केली जाते आणि योग्य आढळल्यासच अर्जदार लॉटरीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतरच सुरक्षा ठेव जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु, फसवणूक झालेल्या व्यक्तीने ही प्रक्रिया न पाळता अज्ञात व्यक्तींनी सांगितलेले पैसे थेट या बनावट वेबसाइटवर जमा केले.

हे ही वाचा>>Mhada Lottery documents : म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 'ही' कागदपत्रे हवीच!

https://housing.mhada.gov.in वर अर्ज केल्याशिवाय थेट पेमेंट केले जात नाही, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. लॉटरीसाठी अर्ज करताना, दिलेली माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा आणि त्यात लिहिलेल्या रकमेनुसार ऑनलाइन पेमेंट करा. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, कोणताही अधिकारी रोख रक्कम मागणार नाही. नोंदणीपासून फ्लॅटच्या चाव्या मिळवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाते.

नागरिकांनी लॉटरीसाठी https://housing.mhada.gov.in वरूनच अर्ज करावेत, इतर कोणत्याही वेबसाइटचा वापर करू नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे. कोणत्याही अनधिकृत वेबसाइटला कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नका. 

म्हाडाने सदनिका विक्रीसाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी कोणत्याही व्यक्ती, संस्थेची किंवा सोशल मीडियाची मदत घेतलेली नाही, तसेच एजंट किंवा दलालाचीही नियुक्ती केलेली नाही. तुमच्याकडे कोणी पैसे मागितल्यास किंवा फसवणूक केल्यास तत्काळ 'म्हाडा'चे दक्षता आणि सुरक्षा अधिकारी किंवा मुंबई विभागाचे उपमुख्य अधिकारी यांना कळवा.

    follow whatsapp