Shravan 2024: हिंदू धर्मात श्रावणी सोमवारचे काय आहे महत्त्व, कशी करतात पूजा?

मुंबई तक

• 02:07 PM • 22 Jul 2024

Shravan 2024 : श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. हा महिना महादेवाशी संबंधित आहे. यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो.

point

श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा?

point

यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

Shravani Somwar 2024 : श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक मानला जातो. हा महिना महादेवाशी संबंधित आहे. याच महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले. हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात. (Shravan 2024 What is the significance of Shravani somvar in hinduism how to worship know the detail information

हे वाचलं का?

वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते. ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे. यंदा श्रावण महिना 22 जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत आहे. 

हेही वाचा : Jitesh Antapurkar : काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर?

श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात. यादिवशी जप, तपस्या आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते. सोमवार हा चंद्र ग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे. या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो.

श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय?

सोमवारी महादेवाची पूजा विशेषत: वैवाहिक जीवनासाठी केली जाते. जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी. कुंडलीत दोष किंवा आरोग्यासंबंधीत समस्या असतील तरीही श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे.

हेही वाचा : Sanjay Raut : "...म्हणून अमित शाह आक्रोश करताहेत" राऊतांचा पलटवार

 
श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा?

सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाने अर्पण केली जातात. यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून शिवमंदिरात जावे. शक्य असल्यास अनवाणी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा. मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा. 

महादेवासमोर साष्टांग नमस्कार घाला. त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा १०८ वेळा जप करा. दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा. देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा. दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करावे आणि नंतर उपवास सोडावा.

'या' महिन्यात कोणते लाभ होतात?

ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजा-विधि करून आशीर्वाद मिळवू शकतात. ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनाही दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते. श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते. या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रहण दोष, राहू दोष, गुरु चांडाळ दोष इत्यादी शांत करता येतात. 

    follow whatsapp