ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एक संतापजनक वृत्त समोर आले आहे. एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 18 वर्षीय इंजिनियरींग शाखेत शिकणाऱ्या एका मुलीला अटक केली आहे. ही माहिती शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली. बुधवारी सकाळी एक 9 वीत शिकणारी मुलगी शाळेतून घरी जात असताना ही घटना घडली.
ADVERTISEMENT
अधिकाऱ्याने या घटनेसंबंधीची माहिती देताना सांगितले की आरोपी मुलाने शाळेत शिकणाऱ्या मुलीला रस्त्यात मिठी मारली आणि चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला. अशाप्रकारे मुलीचा छळ झाल्याचे कळ मुलीच्या आईने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि त्या मुलाच्या विरोधात वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून! पतीला म्हणाली, तुम्ही 20 वर्षांपासून मला...
नेमकी घटना काय?
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंजिनियरींग शाखेत शिकणाऱ्या आरोपी मुलाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (लैंगिक छळ) आणि कलम 78 (पाठलाग करणे) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या मुलीला या आरोपाखाली अटक करण्यात आली, तो सध्या इंटर्नशिप करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अतुल जगताप यांनी दिली.
मुलींच्या लैंगिक छळामध्ये वाढ
खरंतर, शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ होत असल्याच्या बऱ्याच घटना आपल्यासमोर येत असतात. यासंबंधीची अशीच एक बिहारमध्ये जमुई शहरात घडली होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकावर दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप लावण्यात आला होता. सरकारी शाळेचे मुख्याध्यापक शमशेर आलम याने दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला 20 रुपयांचे अमिश दाखवून तिचा लैंगिक छळ केला.
हे ही वाचा: शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा
मुलीच्या म्हणण्यानुसार, आरोपी म्हणाला, "हे 20 रुपये घे आणि तोंड बंद ठेव. पैसे आल्यावर सगळ्यात आधी तुलाच मिळेल." या सगळ्या घटनेनंतर मुलीला मोठा धक्का बसला आणि तिने शाळेत जाणं बंद केलं. मुलीकडून शाळेत न जाण्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मुलीने रडत रडत शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल आपल्या आईला सांगितलं आणि त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
