Uday Kotak : क्रिकेटर होण्याचं स्वप्न भंगलं, नंतर…; अशी आहे कोटक महिंद्रा बँकेच्या जन्माची गोष्ट

रोहिणी ठोंबरे

• 10:23 AM • 03 Sep 2023

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि प्रवर्तक उदय कोटक यांनी 1 सप्टेंबर 2023 पासून व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला. गेल्या 38 वर्षांत कंपनीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Mumbaitak
follow google news

Uday Kotak Struggle Story : कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि प्रवर्तक उदय कोटक यांनी 1 सप्टेंबर 2023 पासून व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला. गेल्या 38 वर्षांत कंपनीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच, उदय कोटक हे बिगर कार्यकारी संचालक म्हणून बँकेशी संबंधित राहणार आहेत. त्यांचा बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढवण्यात येणार आहे. उदय कोटक यांच्या नेतृत्वाखाली कोटक महिंद्रा बँकेने भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठं यश मिळवलं. गेल्या 38 वर्षात अनेक अडचणी आल्या, पण उदय कोटक यांनी आपल्या समज आणि क्षमतेच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात केली. (Uday Kotak’s dream of becoming a cricketer was shattered then how managed Kotak Mahindra Bank)

हे वाचलं का?

जेव्हा उदय कोटक यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न तुटलं…

देशातील सर्वात यशस्वी बँकर्सपैकी एक असलेल्या उदय कोटक यांना एकेकाळी क्रिकेटर बनायचं होतं. पण एका सामन्यादरम्यान चेंडू त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यानंतर या दुखापतीने उदय कोटक यांच्या क्रिकेटपटू बनण्याच्या स्वप्नाला पूर्णविराम लावला.

Rohini Khadse : मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा

वयाच्या 20 व्या वर्षी उदय कोटक क्रिकेटच्या मैदानात डोक्याला चेंडू लागल्याने बेशुद्ध पडले. कुटुंबीय त्यांना घेऊन रूग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, दुखापत जास्त आहे, त्यामुळे तातडीने ऑपरेशन करावं लागेल. या दुखापतीमुळे त्यांना क्रिकेटच्या मैदानाला अलविदा करावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासालाही वर्षभरासाठी ब्रेक लागला. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी क्रिकेटर बनण्याचं स्वप्न सोडलं.

कोटक महिंद्रा बँकेची कमान घेतली हाती!

उदय कोटक यांनी सुमारे 20 वर्ष कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व केले. 22 मार्च 2003 रोजी, कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात बँकिंगसाठी ग्रीन सिग्नल मिळवणारी ही पहिली कंपनी होती. सध्या, कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप सुमारे 3.52 लाख कोटी रुपये आहे.

उदय कोटक यांनी आनंद महिंद्रांच्या मदतीने 1986 मध्ये एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी सुरू केली. याची सुरुवात फक्त 30 लाख रुपयांच्या भांडवलाने झाली. बिल सवलतीपासून सुरू झालेल्या या फर्मचा नंतर कर्ज पोर्टफोलिओ, स्टॉक ब्रोकिंग, गुंतवणूक बँकिंग, विमा आणि म्युच्युअल फंडांमध्ये विस्तार झाला आणि नंतर 2003 मध्ये, तिचे रूपांतर नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी कोटक महिंद्रा बँकेत झाले.

Chandrayaan 3 : लँडर-रोव्हर चंद्राच्या कुशीत झोपणार, चांद्रयान 3 मोहिमेचं काय होणार?

उदय कोटक यांनी निवडला वेगळा मार्ग

15 मार्च 1959 रोजी गुजराती व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या उदय कोटक यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांचा कौटुंबिक व्यवसाय कापसाचा व्यापार होता. पण त्यांनी कुटुंबापासून दूर राहून वेगळा मार्ग निवडला. सुरुवातीला कुटुंबीय त्यांच्याशी सहमत नव्हते. पण उदय कोटक यांचे उदात्त हेतू होते आणि त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी कोटक बँकेचा पाया उभारला होता.

उदय कोटक लहानपणी चांगले क्रिकेटपटू होते आणि अभ्यासातही हुशार होते. गणित हा त्यांचा आवडता विषय असून गणिताच्या विद्यार्थ्याने बँकिंग क्षेत्रात प्रवेश केल्यावर चांगलं यश मिळवलं. उदय कोटक यांनी सिडनाम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर ‘जमना लाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’मधून एमबीए केलं.

Adani Group : OCCRP Report मुळे चर्चेत आलेले विनोद अदाणी कोण आहेत?

पत्नीचीही महत्त्वाची भूमिका

पदव्युत्तर शिक्षणानंतर, उदय कोटक यांनी ‘कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेड’ कडून बिल सवलत सेवा सुरू केली, त्यानंतर महिंद्रा समूहाच्या विलीनीकरणानंतर ही कंपनी ‘कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड’ बनली. उदय कोटक यांच्या यशामागे त्यांची पत्नी पल्लवी कोटक यांची महत्त्वाची भूमिका आहे.

दोघं 1985 मध्ये लग्नबंधनात अडकले. सुरुवातीच्या काळात पल्लवी कोटक यांनी उदय कोटक यांना नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कोरोना संकटाच्या काळातही कोटक महिंद्रा बँकेने लॉकडाऊन मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी भांडवल उभारले.

    follow whatsapp