Optical Illusion Test : फोटोत दिसतोय 'OLD'; पण कुठेतरी लपलंय 'GOLD', दिमाग असेल तर शोधून दाखवा

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 08:32 PM)

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर अनेकदा असे फोटो व्हायरल होतात, ज्यांना पाहिल्यावर ते सामान्य वाटतात. पण या फोटोंमध्ये काही ना काही लपलेलं असतं. हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना धोका देणारे असतात.

OLD And GOLD Word Optical Illusion Photo

Optical Illusion Viral Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा एव्हढा कठीण फोटो कधी पाहिला नसेल

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेलं GOLD शोधून दाखवा

point

...तरच तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेला GOLD शोधता येईल

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर अनेकदा असे फोटो व्हायरल होतात, ज्यांना पाहिल्यावर ते सामान्य वाटतात. पण या फोटोंमध्ये काही ना काही लपलेलं असतं. हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना धोका देणारे असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांचा गोंधळ उडतो. कारण फोटोमध्ये असलेले बारकावे शोधण्यात अशाच लोकांना यश मिळतं, ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी असते. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत OLD हा शब्द सर्व ठिकाणी लिहिला आहे. पण या फोटोत कुठेतरी GOLD हा शब्दही लिहिलेला आहे. हाच शब्द तुम्हाला 10 सेकंदाच्या आत शोधायचा आहे. 

हे वाचलं का?

हा व्हायरल फोटो ऑप्टिकल इल्यूजनचा योग्य उदाहरण आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता तुम्ही या फोटोला नीट बघा आणि त्यात लपलेला GOLD शब्द शोधून दाखवा. फोटोकडे पाहिलं तर सर्वच ठिकाणी OLD असल्यासारखं दिसत आहे. पण त्या फोटोत GOLD नेमका कुठे लपला आहे, हे शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल.

हे ही वाचा >> Vidhan Sabha Election 2024: सगळ्यात इंटरेस्टिंग Fights, पाहा कोणते उमेदवार आहेत प्रचंड चर्चेत

पिवळ्या रंगाच्या या फोटोत OLD च्या गर्दीत लपलेला GOLD शोधणे सर्वांनाच जमेल असं नाही, पण ज्या लोकांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्यांना या फोटोत लपलेला GOLD शब्द दहा सेकंदाच्या आत शोधता येईल. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो कठीण असतात, पण त्यांना तीक्ष्ण नजरेत पाहिलं, तर त्यातील कठीण गोष्टी सोप्या वाटू लागतात. 

हे ही वाचा >> Mahim Viral Video : "आमच्या दरवाज्यातून निघ...", महिलांनी सदा सरवणकरांंना थेट सुनावलं!

ज्या लोकांनी ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेला GOLD शब्द दहा सेकंदाच्या आत शोधला आहे, ते सर्व बुद्धीमान आहेत, असं नक्कीच म्हणता येईल. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेला गोल्ड शब्द शोधता आला नाही, त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील हे मात्र नक्की. ज्यांना या फोटोतील गोल्ड शब्द अजूनही शोधता आला नाही, अशा लोकांनी टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण फोटोत OLD च्या गर्दीत GOLD नेमका कुठे लपला आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पिवळ्या रंगाच्या फोटोकडे पाहिलं तर रेड रंगाच्या बॉक्समध्ये GOLD लिहिलेलं तुम्ही पाहू शकता. 

    follow whatsapp