Ladki Bahin Yojana: '...तरच लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Amit Shah On Ladki Bahin Yojana: विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजाही सुरु आहे. महायुती सरकारने ही योजना सुरु केल्यापासून विरोधी पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली आहे.

Amit Shah On ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 2100 rs Update

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 04:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

Amit Shah On Ladki Bahin Yojana: विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजाही सुरु आहे. महायुती सरकारने ही योजना सुरु केल्यापासून विरोधी पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली आहे. निवडणुकीतील मतदानाचा स्वार्थ पाहून महायुतीने ही योजना सुरु केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अशातच सर्व पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या असून लाडकी बहीण योजनेबाबतही मोठी आश्वासनं दिली जात आहेत. महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली असून महिलांना दरमहा 3 हजार रूपये देण्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिलांना मोठी खुशखबर दिली आहे. 

हे वाचलं का?

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर अमित शाह यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. शाहांनी रावेर आणि मलकानपूर येथे रविवारी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'मविआ जर सत्तेत आली, तर लाडकी बहीण योजना बंद करतील'.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल! राज्यात 'या' भागात कसंय वातावरण? वाचा IMD रिपोर्ट

रावेरमध्ये अमित शाह म्हणाले, महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला विरोध केला आहे. यांचं सरकार आलं, तर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बनणार आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये वाढवून 2100 केले जातील. 

हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे

महाराष्ट्रातील ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून कमी आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य म्हणून 1500 रुपये दिले जातात. महायुतीकडून आश्वासन देण्यात आलं आहे की, जर महायुती सत्तेत आली, तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 2100 रुपये केले जातील. 

    follow whatsapp