UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे संतापजनक घटना घडली. पोलिसांना आसिफा नावाच्या तरुणीचा मृतदेह एका डम्पिंग ग्राऊंडमध्ये आढळला. मृत आसिफा गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता होती. पोलिसांनी मृत महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा पती, दीर आणि काकीला अटक केली आहे. आसिफाचा लग्नानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने तिच्या दिरासोबत लग्न केलं होतं. परंतु, आसिफाच्या पतीला संशय होता की, तिचा तिसऱ्या व्यक्तीसोबत अफेयर आहे. याच संशयामुळे तिच्या पतीने छोटा भाऊ (आसिफाचा पहिला पती) आणि काकीसोबत मिळून आसिफाची हत्या केली.
ADVERTISEMENT
काय आहे आसिफाच्या हत्येचं संपूर्ण प्रकरण?
दरम्यान, आसिफाच्या आईची तिच्यासोबत भेट झाली नव्हती. मागील अडीच वर्षांपासून आसिफा आणि तिच्या आईची भेट झाली नव्हती. त्यामुळे तिच्या आईचा संशय बळावला. तिला वाटलं की, आसिफाच्या सासरच्या लोकांनी तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं असेल. त्यामुळे आसिफाच्या आईने बिजनौरच्या चांदपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर आली.
हे ही वाचा >> टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून, कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधला, कंपनीतला व्हायरल व्हिडीओ काय?
पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी आसफाच्या पतींसोबत अनेकांची चौकशी केली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आसिफाचा पहिला पती आदिल आणि दिर कामिलने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस तपासात उघड झालं की, आसिफाचा अफेयर अन्य व्यक्तीसोबत सुरु आहे, असा संशय आदिलला होता. या कारणामुळे आदिलने त्याचा छोटा भाऊ कामिल आणि काकीशी संगनमत करून आसिफाचा गळा चिरून हत्या केली.
हे ही वाचा >> हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
त्यानंतर तिचा मृतदेह हल्लापूरा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये खड्ड्यात टाकला. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना आसिफाचा मृतदेह या डम्पिंग ग्राऊंडमध्ये तीन-चार फूट खोल खड्ड्यात सापडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आदिल,कामिलला अटक केलीय. सहआरोपी आदिलच्या काकीवरही कारवाई करण्यात आलीय.
ADVERTISEMENT
