SGB Tranche Open for Subscription : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना आणली आहे. आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड (एसजीबी) ची नवीन योजना लॉन्च केली. ज्या अंतर्गत ग्राहक 11 सप्टेंबरपासून सलग पाच दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत गोल्ड बाँड खरेदी करता येईल. विशेष म्हणजे हे सोने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार असून ऑनलाइन पेमेंट करण्यावरही सूट दिली जात आहे. यासाठी गोल्ड बाँड कसे खरेदी करायचे याविषयी जाणून घेऊयात. (What is Sovereign Gold Bond how much return how to buy Know everything)
ADVERTISEMENT
सार्वभौम गोल्ड बाँड (SGB) ची नवीन योजना भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने लॉन्च केली. SGB सीरिज II साठी सब्सक्रिप्शन कालावधी 11 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. बाँडची किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. 6 ते 7 सप्टेंबरच्या बुलियन मार्केटच्या आधारे ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी, जे गुंतवणूकदार गोल्ड बाँड खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज करतात किंवा डिजिटल मोडद्वारे पेमेंट करतात त्यांना निश्चित किंमतीवरून 50/- रुपये प्रति ग्रॅम सूट मिळेल, त्यानंतर गोल्ड बाँडची किंमत 5,873/- प्रति ग्रॅम असेल.
Maratha Reservation : ओबीसींच आरक्षण कमी होणार? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
सार्वभौम गोल्ड बाँडचा कालावधी आणि व्याजदर
सार्वभौम गोल्ड बाँड (SGB) योजनेचा मॅच्युरिटी कालावधी एकूण 8 वर्षांचा आहे. तर, गुंतवणूकदार 5 वर्षांत त्यातून बाहेर पडू शकतात. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना सहामाही नाममात्र मूल्यावर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज दिले जाते.
SGB योजनेअंतर्गत सोने खरेदीवरील मर्यादा काय?
सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत सोने खरेदी करण्यासाठी किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल, तर जास्तीत जास्त 4 किलोग्रॅम खरेदी करण्याची मर्यादा आहे. HUF साठी खरेदी मर्यादा 4 किलोग्रॅमवर निश्चित केली आहे. तर, ट्रस्ट आणि इतर समान संस्थांसाठी 20 किलोग्रॅमची खरेदी मर्यादा आहे.
ADVERTISEMENT