Maharashtra Werther Updates : राज्यात सध्या सगळीकडेच थंडीचा कडाखा चांगलाच वाढलेला दिसतो आहे. बहुतांश भागात सध्या वातावरण दिवसा शुष्क आणि कोडरं हवामान राहणार असून, रात्री मात्र गारठा चांगलाच वाढलेला दिसणार आहे. उत्तर पश्चिम भारतात थंडीची लाट येणार असून, डिसेंबरच्या मध्यानंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातलं हवामान सध्या कोरडं राहील. तर उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात वातावरणात गारठा वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>EPF Money From ATM: 7 कोटी लोकांसाठी मोठी बातमी... आता ATM मधून थेट काढता येणार PF चे पैसे
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट असून, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरतही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतात 11 डिसेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचा इशारा नाही. राज्यात यंदा अनेक ठिकाणी अजूनही थंडी पडलेली दिसत नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात फळबागांसाठी हवामान पोषक नसेल अशी शक्यता आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची चांगलीच लाट आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये गारवा आहे. त्याचा परिणाम होऊन येणाऱ्या काळात अर्थातच 20 डिसेंबरपासून राज्यात चांगलाच कडाखा जाणवायला सुरूवात होईल.
ADVERTISEMENT