Narali Purnima 2023: सण आयलाय गो… कोळी बांधव का साजरी करतात नारळी पौर्णिमा?

रोहिणी ठोंबरे

29 Aug 2023 (अपडेटेड: 29 Aug 2023, 09:14 AM)

नारळी पौर्णिमेचा सण महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. समुद्र देव वरूण यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे.

Mumbaitak
follow google news

Narali Purnima Celebration In Maharashtra : नारळी पौर्णिमेचा सण महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. समुद्र देव वरूण यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे. हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. (Why do Koli People celebrate Narali Purnima)

हे वाचलं का?

हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण महिन्यात पौर्णिमा साजरी केली जाते आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा असंही म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 31 ऑगस्ट 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी नारळ एक महत्त्वाचा उद्देश पूर्ण करतो. लोक समुद्राला नारळ अर्पण करतात. या दिवसानंतर वाऱ्याचा जोर आणि दिशा बदलते.

Love and Crime: आईनेच पोटच्या लेकीला विकलं, मुलाला…; अन् प्रियकरासोबत झाली फरार!

नारळी पौर्णिमेचे महत्त्व

नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समुद्र देवता वरुणची विशेष पूजा करतात. या दिवशी भगवान वरुणला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, श्रावण पौर्णिमेला पूजा विधी केल्याने भगवान वरुण प्रसन्न होतात आणि समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छिमारांचे रक्षण करतात. नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणार्‍या मच्छिमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते. नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहेत आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे. या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.

नृत्य आणि गायन हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख, आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल याचे सूचक आहे.

Santosh Bangar : आमदार बांगर आले जोशात अन्.. थेट पोलिसातच गुन्हा दाखल !

नारळी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत

  • या उत्सवाच्या काही दिवस आधी, मच्छीमार त्यांचे जुने मासेमारीचे जाळे दुरूस्त करतात, जुन्या बोटी रंगवतात किंवा नवीन बोट विकत घेतात आणि मासेमारीची जाळी बनवतात.
  • उत्सवाच्या दिवशी भक्त समुद्र देव वरूणची पूजा करतात.
  • महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण श्रावणी उपकर्म करतात आणि या दिवशी कोणताही पदार्थ न खाता उपवास करतात. ते फक्त नारळ खाऊन फलाहार करतात.
  • सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यांसारखे पारंपारिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश असतो.
  • मच्छिमारांसाठी समुद्र पविक्ष आहे कारण त्यांच्या उदर्निवाहाचे ते मूळ साधन आहे. ते बोटींचीही पूजा करतात.
  • पूजा विधी पूर्ण केल्यानंतर, मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटीतून समुद्रात जातात. एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परततात आणि उर्वरित दिवस नाचण्यात आणि गाण्यात घालवतात.

नारळी पौर्णिमा 2023, महत्वाच्या तारखा आणि वेळ

  • नारळी पौर्णिमेचा दिवस 30 ऑगस्ट, 2023 सकाळी 10:58 वाजता सुरू होतो.
  • तर, 31 ऑगस्ट, 2023 सकाळी 07:05 वाजता पौर्णिमा समाप्त होते.

नारळी पौर्णिमेची परंपरा

दक्षिण भारतात, समाजातील प्रत्येक वर्ग आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करतो. या दिवशी उपनयन किंवा यज्ञविधी मोठ्या प्रमाणावर केला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. म्हणूनच या सणाला अबितम, श्रावणी किंवा ऋषी तर्पण असेही म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ब्राह्मणांना अन्नदान किंवा दान देण्याचीही परंपरा आहे.

Student Suicide : CID मध्ये झालेली निवड, पण.. 22 वर्षीय तरुणीने का संपवलं आयुष्य?

Raksha Bandhan 2023 : यावर्षी रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त केव्हा आहे?

दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनचा वेळ, तिथी आणि मुहूर्त याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण यावेळी त्याच्या दोन तारखा येत आहेत. 30 की 31 ऑगस्ट या दोन दिवसांपैकी रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरं करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. चला जाणून घेऊया दोनपैकी कोणत्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाईल, कोणत्या शुभ मुहूर्तावर बहिण भावाला राखी बांधू शकते.

यावर्षी भद्रकाळामुळे रक्षाबंधनच्या 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही तारखांबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. माहितीनुसार भद्रकाळात राखी बांधली जात नाही. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी पौर्णिमा तिथी 30 ऑगस्टच्या सकाळी 10:58 पासून सुरू होईल आणि 31 ऑगस्ट 2023 च्या सकाळी 07:05 वाजता संपेल. पण पौर्णिमा आणि भद्रकाळ एकाच वेळी असल्याने हिंदू धर्मात या काळात राखी बांधणे शुभ मानले जात नाही.

भद्रकाळ रात्री 9.02 वाजता संपेल. हे संपल्यानंतरच बहिण भावाला राखी बांधू शकेल. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचं तर ते 30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9:02 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 पर्यंत राहील. देशात अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा सण उदय तिथीनुसार साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत 31 ऑगस्टलाही अनेक जण हा सण साजरा करतील. पौर्णिमा 31 ऑगस्टच्या सकाळी 07:05 पर्यंत आहे. म्हणजेच मुहूर्तानुसार 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन साजरे करता येईल.

    follow whatsapp