Lok Sabha Election 2024: BJP च्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान नाही, पण महाराष्ट्रातील 'या' नेत्याला दिली उमेदवारी

मुंबई तक

02 Mar 2024 (अपडेटेड: 02 Mar 2024, 07:59 PM)

Kripashankar Singh: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील बडे नेते असलेले कृपाशंकर सिंह यांना थेट उत्तर प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे.

कृपाशंकर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

कृपाशंकर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

कृपाशंकर सिंह यांना लोकसभेचं तिकीट

point

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून दिली उमेदवारी

point

भाजपकडून 195 जणांची यादी

Lok Sabha Election 2024 Kripashankar Singh: मुंबई: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपने तब्बल 195 उमेदवार जाहीर केले आहेत. पण या यादीत महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. पण असं असलं तरीही महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला थेट उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. (maharashtra has no place in bjp first list lok sabha election 2024 but kripashankar singh has been announced as a candidate from uttar pradesh jaunpur)

हे वाचलं का?

भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात दिल्ली मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या 195 उमेदवारांची नावं जाहीर केली. पण त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेची घोषणा करण्यात आली नाही.

मात्र, असं असलं तरीही ज्यांनी महाराष्ट्रातच आपलं राजकीय करिअर घडवलं त्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आहे.

खरं तर आतापर्यंत ज्या चर्चा सुरू होत्या त्यात कृपाशंकर सिंह यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र, त्यांना थेट उत्तर प्रदेशमधून तिकीट देण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबईचे कृपाशंकर पुन्हा उत्तर प्रदेशात...

कृपाशंकर सिंह मूळचे उत्तर प्रदेशचे असले तरी त्यांची राजकीय जडणघडण ही पूर्णत: महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईत झाली. ते महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारमध्ये राज्य गृहमंत्री म्हणून होते. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह हे मुंबईतील कलिना येथील माजी आमदार होते. त्यांचे वडिलोपार्जित गाव हे उत्तर प्रदेशमधील जौनपूर आहे.

कृपाशंकर सिंह यांचा मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांमध्ये विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये विशेष प्रभाव आहे. छठ पूजा असो किंवा उत्तर प्रदेशातील इतर कोणताही कार्यक्रम त्यामध्ये ते नेहमीच विशेष योगदान द्यायचे. याच गोष्टीचा त्यांना आता जौनपूरमध्ये लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. त्यामुळेच भाजपने त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. 

भाजप काही महिन्यापूर्वीच देशभरात एक प्रचार मोहीम राबवली होती. ज्यामध्ये जाहीर सभा, रॅली आणि सर्वसामान्यांशी संपर्क साधणं असा कार्यक्रम होता. त्यासाठी भाजप अनेक नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. ज्यामध्ये  कृपाशंकर सिंह यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्याने त्यांचं पक्षातील वजनही वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

 

    follow whatsapp