Vima Sakhi Yojana : LIC ने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पुन्हा एकदा चांगलाच धनलाभ होणार आहे. कारण या योजनेतून महिलांना दरमहा किमान 7000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 9 डिसेंबरला या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
एका वर्षाच्या आत 1,00,000 विमा सखींना पॅनेलमध्ये समाविष्ट करणं हे या विमा सखी योजनेचं उद्दिष्ट आहे. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवून त्यांना स्वत:ला उभं करण्यासाठी आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ही खास योजना आणण्यात आली आहे. LIC विमा सखी योजनेमुळे फक्त ग्रामीण भागातच नाही, तर दुर्गम भागातील महिलांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
हे ही वाचा >>Dindigul Hospital Fire : खासगी रुग्णालयाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20 पेक्षा जास्त रुग्णांना..
सामाजिक कल्याणाची जोड व्यवसाय वाढीशी घालून एलआयसीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ही योजना आणली असून, 18 ते 50 वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. किमान 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं ही योजनेसाठी अट असेल. LIC महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत पुढील 12 महिन्यांत 1 लाख विमा सखींची आणि तीन वर्षांत 2 लाख विमा सखींची नोंदणी करण्याच्या ध्येय सध्या LIC ने ठेवलं आहे.
काय आहेत योजनेचे वैशिष्ट्य?
- विमा सखी योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनव्यतिरिक्त सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी निश्चित स्टायपेंड दिला जाणार आहे.
- महिलांचे अंदाजे मासिक उत्पन्न 7,000 रुपयांपासून सुरू होईल.
- महिलांना पहिल्या वर्षात प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मिळतील.
- दुसऱ्या वर्षी मासिक पगार 6,000 रुपये होईल.
- तिसऱ्या वर्षापर्यंत ही रक्कम 5,000 रुपयांपर्यंत येईल.
- ज्या महिला विक्रीचं टार्गेट पूर्ण करतील किंवा त्यापेक्षा जास्त करतील, त्यांना अतिरिक्त कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
- या योजनेत काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असून, एलआयसीकडून एजंटना प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. नावनोंदणी करून, महिलांना पहिल्या तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक साक्षरता सहाय्य मिळणार आहे. पदवीधर झालेल्या विमा सखींना LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. तसंच कंपनीत विकास अधिकारी पदासाठीही त्यांची निवड होऊ शकते.
कोण कोण करु शकतं अर्ज?
हे ही वाचा >> Mumbai Crime News : वासनांध प्रवाशनं थेट टॅक्सीमध्येच महिलेसमोर सुरू केलं... ग्रँट रोड परिसरातील चीड आणणारी घटना
18 ते 50 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. यासाठी किमान पात्रता 10वी उत्तीर्ण असून, ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. सध्या काम करत असलेल्या एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेअंतर्गत अपात्र केलं जाईल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:00 वाजता अधिकृतपणे ही योजना लॉन्च केली. त्यानंतर आता इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. नावनोंदणी तपशील आणि अर्जाचा फॉर्म LIC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.
ADVERTISEMENT