Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 06:39 PM)

Ajit Pawar NCP 2nd List : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज दुसरी यादी जाहीर केली आहे.

अजित पवार यांची दुसरी यादी

अजित पवार यांची दुसरी यादी

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवाब मलिक यांच्या लेकीला तिकीट

point

ज्ञानेश्वर कटके यांनाही उमेदवारी

point

किती उमेदवार आयात केलेत?

Maharashtra Assembly Election 2024 NCP (Ajit Pawar) 2nd Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज दुसरी यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या पक्षानेही दुसरी यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 7 उमेदवारांची यादी समोर आली आहे. 

हे वाचलं का?

शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. कारण या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलं आहे. अशावेळी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर आहे.

भाजपने पहिल्या यादीत 99 जागांवर उमेदवार घोषित केले. तर आता अजित पवारांनी देखील आपल्या पक्षाकडून 38 उमेदवांरांची नावं जाहीर केली होती. ज्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. अनुशक्तिनगर, शिरूर, तासगाव सारख्या महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढविणार हे स्पष्ट आहे. अशावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना नेमक्या किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता भाजपशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही यादी जाहीर झाल्याने बरंचस चित्र स्पष्ट झालं आहे.

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (Ajit Pawar) 2nd Candidates List)

  1. सुनिल टिंगरेंना - वडगाव शेरी
  2. सना मलिक - अणुशक्तीनगर
  3. संजयकाका पाटील - तासगाव कवठे महांकाळ
  4. निशिकांत पाटील - इस्लामपूर
  5. ज्ञानेश्वर कटके - शिरूर
  6. झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व 
  7. प्रताप चिखलीकर - लोहा कंधार

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (Ajit Pawar) 1st Candidates List)

  1. अजित पवार- बारामती
  2. दीलिप वळसे पाटील- आंबेगाव
  3. सुलभा खोडके- अमरावती
  4. दत्ता भरणे- इंदापूर
  5. अण्णा बनसोडे-पिंपरी
  6. निर्मला विटेकर-पाथरी
  7. सुनील शेळके-मावळ
  8. छगन भुजबळ- येवला
  9. हसन मुश्रीफ-कागल
  10. माणिकराव कोकाटे- सिन्नर
  11. नरहरी झिरवळ - दिंडोरी
  12. धनंजय मुंडे - परळी
  13. दौलत दरोडा - शहापूर
  14. हिरामण खोसकर - इगतपुरी
  15. अनिल पाटील - अमळनेर
  16. संग्राम जगताप - अहमदनगर
  17. आदिती तटकरे - श्रीवर्धन
  18. संजय बनसोडे- उदगीर
  19.  बाबासाहेब पाटील - अहमदपूर
  20. दिलीप मोहिते-पाटील - खेड-आळंदी
  21. राजकुमार बडोले - अजुर्नी मोरगाव
  22. प्रकाश सोळंखे - माजलगाव
  23. मकरंद पाटील - वाई
  24. आशुतोष काळे - कोपरगाव
  25. इंद्रनील नाईक - पुसद
  26. भरत गावित - नवापूर
  27. नजीब मुल्ला - मुंब्रा-कळवा
  28. किरण लहामटे - अकोले
  29. शेखर निकम - चिपळूण
  30. यशवंत माने - मोहोळ
  31. राजेश पाटील - चंदगड
  32. हिरामण खोसकर - इगतपुरी
  33. राजू कारेमोरे - तुमसर
  34. चंद्रकांत नवघरे - वसमत
  35. नितीन पवार - कळवण
  36. धर्मराव बाबा आत्राम - अहेरी
  37. अतुल बेनके - जुन्नर
  38. चेतन तुपे - हडपसर

2109 मध्ये फडणवीसांसोबत शपथविधी आणि 2023 मध्ये बंड

2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्यांचं हे सरकार अवघे 72 तासच टिकलं होतं. ज्यानंतर ते पुन्हा महाविकास आघडीत आले आणि त्यातही त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. 

दरम्यान, ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार यांनी 2023 साली पुन्हा बंड केलं. पण यावेळचं त्यांचं बंड हे यशस्वी ठरलं. कारण त्यांच्यासोबत जवळजवळ 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. एवढंच नव्हे तर शिवसेनेप्रमाणेच अजित पवार यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. जो दावा मान्य करत आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मोठं अपयश 
दरम्यान, भाजपसोबत गेल्यानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात फारसा फायदा झाला नाही. कारण महायुतीमध्ये त्यांच्या पक्षाला केवळ 5 जागा देण्यात आल्या होत्या. ज्यापैकी केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. खुद्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देखील बारामतीत पराभव स्वीकारावा लागला. 

असं असताना आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना कोणत्याही परिस्थितीत आपला परफॉर्मन्स हा सुधारावा लागणार आहे.

 

    follow whatsapp