Election 2024: "माझी राजकीय आत्महत्या...", बंडखोर नाना काटेंची निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

04 Nov 2024 (अपडेटेड: 04 Nov 2024, 03:48 PM)

Nana Kate Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. राज्यात एकचा टप्प्यात मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

Nana Kate Latest News

Nana Kate Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणार राजकीय उलथापालथ?

point

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे यांनी घेतली माघार

point

राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण

Nana Kate Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. राज्यात एकचा टप्प्यात मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. परंतु, बंडखोरीमुळे मतांचं गणित बिघडू शकतं, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून बंडखोर नेते नाना काटे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. 'माझी राजकीय आत्महत्या झाली आहे', असं खळबळजनक विधान नाना काटे यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

शंकर जगतापांच्या भेटीनंतर बंडखोर नाना काटेंची निवडणुकीतून माघार घेतलीय. माझी राजकीय आत्महत्या झाली असून अजित दादांसाठी माघार घेतली. बाळा भेडगे शेळकेंचं काम करणार आहेत, असंही काटे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे यांनी अखेर माघार घेतली.  

हे ही वाचा >>  Sada Saravankar: 'अमित ठाकरे जिंकून येणं कठीण', 'ते' समीकरण समजवून द्यायला सरवणकर गेले राज ठाकरेंच्या घरी!

नाना काटे हे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुक होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. महायुतीकडून अजित पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर काटे यांनी माघार घेतली. आज सकाळी निवडणूक लढण्यावर ठाम असलेले नाना काटे यांनी शंकर जगतापांच्या भेटीनंतर माघार घेतली. मावळ विधानसभा मतदारसंघात चिंचवड प्रमाणेच माघार घेऊन महायुतीच्या उमेदवाराला मदत केली जाईल, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, असंही काटे म्हणाले. 

    follow whatsapp