मुंबई: माहीम विधानसभा निवडणुकीतील रंगत ही वाढतच आहे. आज (4 नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, तरीही शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे न घेण्यावर ठाम आहे. एवढंच नव्हे तर अर्ज मागे घेतला तरी अमित ठाकरे हे निवडून येणार नाही. त्यामुळे येथील समीकरण समजविण्यासाठी आपण राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहोत. अशी माहिती स्वत: सदा सरवणकर यांनी दिली.
ADVERTISEMENT
काही वेळापूर्वीच सदा सरवणकर हे 'वर्षा'वर गेले होते. जिथे त्यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली होती. त्यानंतर बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'अमितजी निवडून येणं कठीण', सदा सरवणकर जाणार राज ठाकरेंच्या घरी
प्रश्न आता असं राहतो की, मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमितजी निवडून आलेच पाहिजे अशी आमची भावना आहे. तिथलं जे समीकरण आहे हे समीकरण अमितजी निवडून येतील अशी काही खात्री नाही. म्हणून राजसाहेबांना आम्ही जाऊन भेटणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत. तसंच जे समीकरण आहे ते समजवून सांगणार आहोत.
मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. पण आम्ही राज ठाकरेंना सांगणार आहोत की, जे समीकरण आहे त्या समीकरणात अमितजींना निवडून येणं कठीण आहे. ते समजवून सांगण्यासाठी आम्ही चाललो आहे.
मी वैयक्तिक लोभापोटी कोणतीही गोष्ट करायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जे काही करायला लागेल ते करायची आमची तयारी आहे.
अमित ठाकरेंना काही जणं पाठिंबा देत आहेत. पण ते काही जण मैत्रीखातर करत आहेत. त्याला अखंड भाजप असं म्हणता येणार नाही. भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता हा माझ्या बरोबर आहे.
ADVERTISEMENT