Ajit Pawar : ...म्हणून आम्ही वेगळा पाडवा साजरा करायचा निर्णय घेतला, अजित पवार यांनी सांगितलं कारण

मुंबई तक

02 Nov 2024 (अपडेटेड: 02 Nov 2024, 03:08 PM)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता या पाडवा सणामध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार पाडव्याबद्दल काय म्हणाले?

point

बारामतीत दोन वेगळे पाडवे का साजरे केले गेले?

point

गोविंदबागेतील पाडव्याबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar Vs Sharad Pawar बारामती : राज्यात आणि देशात सध्या मोठ्या उत्साहात दिवाळी आणि पाडवा साजरा केला जातो. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणातही पाडव्याला मोठं महत्व आहे. त्यातच  बारामतीमध्ये पवारांच्या घरी दरवर्षी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येत असतो. या पाडव्यावर सर्वांचं लक्ष लागून असतं. यावेळी शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी बारामतीकर आणि पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र काही महिन्यांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता या पाडवा सणामध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Sanjay Raut : फडणवीसांना मुख्यमंत्र्यांपासूनच धोका? सागर बंगल्यावर सुरक्षा वाढवल्यानंतर संजय राऊत यांचा खळबळजनक सवाल

 

बारामतीमध्ये शरद पवार यांचं निवासस्थान गोविंदबागमध्ये दरवर्षी पाडवा साजरा केला जातो. यावेळी राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असायचे. मात्र, अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राजकारण बरंच बदललं. अजित पवार यांनी यंदा पाडवाही काटेवाडीला आपल्या निवासस्थानी साजरा केला आहे. इथेच त्यांचे सगळे समर्थक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, गोविंदबागेला सर्व शुभेच्छूक येत असत. त्यामध्ये काही माझे आणि काही शरद पवार यांना शुभेच्छा द्यायला यायचे. त्यामुळे तिथे मोठी गर्दी होत असत, वेळ लागत असत. त्यामुळे आम्ही आता दोन वेगळे पाडवे साजरे केले. लोकांना जास्त वेळ ताटकळत थांबावं लागू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. 

 

हे ही वाचा >>CM Eknath Shinde : राज ठाकरेंना मी विचारलंही होतं, पण त्यांनी थेट... संवाद तुटला? दादर-माहिमचा मुद्दा तापला

 

दरम्यान, बारामतीत यंदा लोकसभेसारखीच लढत चित्र निर्माण झालं असल्याचं दिसतंय. कारण पुन्हा एकदा एकाच कुटुंबातले दोन उमेदवार बारामतीच्या मैदानात विधानसभेसाठी उतरले आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. त्यामुळे या लढतीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासाठी दोन्हीही नेते दंड थोपटून मैदानात उतरल्याचं दिसतंय. त्यामुळे आता इथे नेमकं कुणाचं पारडं जड ठरणार हे पाहावं लागणार आहे.

    follow whatsapp