CM Eknath Shinde: "काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री...", शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई तक

16 Nov 2024 (अपडेटेड: 16 Nov 2024, 06:07 PM)

Eknath Shinde On Uddhav Thackeray : बाळासाहेबांनी नेहमी त्या काँग्रेसल दूर ठेवलं. त्यांच्यासोबत यांनी घरोबा केला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री झाले. काय मिळवलं? शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला.

Eknath Shinde On Uddhav Thackeray

Eknath Shinde On Uddhav Thackeray

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर केली टीका

point

"दीपक केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर..."

point

सावंतवाडीच्या सभेत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde On Uddhav Thackeray : बाळासाहेबांनी नेहमी त्या काँग्रेसल दूर ठेवलं. त्यांच्यासोबत यांनी घरोबा केला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री झाले. काय मिळवलं? शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. आमदारांची ससेहोलपट झाली. आमदारांचं खच्चीकरण झालं. शिवसेनेचं खच्चीकर झालं. आम्ही उघड्या डोळ्याने ते पाहू शकत नव्हतो. म्हणून या एकनाथ शिंदेंने उठाव केला आणि 50 आमदार सत्ता सोडून आम्ही गेलो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.ते सावंतवाडी येथे शिवसेनेच्या प्रचारसभेत बोलत होते. 

हे वाचलं का?

लोकं सत्तेकडे जातात. आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो. त्यामध्ये केसरकर माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे होते. गुवाहाटीला त्यांनी चांगलं काम केलं. केसरकर कोकणातील सफरचंद आहेत. केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर...ऑलराऊंडर, बॅटिंग-बॉलिंग, विकेटकिपींग सर्वच ते करतात. मॅच आपल्याला जिंकून देण्याचं काम केसरकर करतात. याचा मला अभिमान आहे. रिंगणात कुणीही उतरू दे. प्रत्येक मॅच आम्ही जिंकतो. आता विजयाचा चौकार मारून ते सावंतवाडीचा कप जिंकल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा >> Priyanka Gandhi: "महिलांनो सतर्क व्हा,1500 रुपयात...", लाडकी बहीण योजनेवरून प्रियांका गांधींनी केलं मोठं आवाहन

शिंदे पुढे म्हणाले, या कोकणात शिवसेना आणि बाळासाहेब हे अनोखं समीकरण होतं. राणे साहेबांच्या काळात शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. शिवसेना आणि कोकण एक वेगळं नातं निर्माण झालं. शिवसेना आणि कोकण एक वेगळं समीकरण निर्माण झालं. कोकणी माणसांनी बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं. बाळासाहेबांनीही कोकणी माणसांवर भरभरून प्रेम केलं. कोकणी माणूस प्रेमळ आहे. बाहेरून फणसासारखा काटेरी पण आतून गोड गऱ्यासारखा आहे.

हे ही वाचा >> Nana Patole: निवडणूक जिंकल्यानंतर MVA चा मुख्यमंत्री कोण होईल? नाना पटोलेंनी थेट सांगितलं

ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा विश्वासघात केला. 2019 ला बाळासाहेब आणि पंतप्रधान मोदी दोघांचे फोटो लावून मतं मागितली पण सरकार शिवसेना-भाजपचं आलं नाही. दुर्देवाने अनैसर्गिक आघाडी झाली. 
मी संपूर्ण राज्यभारत मी सगळीकडेच सभा घेतोय. आपल्या लाडक्या दीपक केसरकरांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आलाय. धनुष्यबाणासकट आता ते चौकार मारणार आहेत. दीपक केसरकरांना गेली पंधार वर्षे पर्याय निर्माण झाला नाही, असंही शिंदे म्हणाले.

    follow whatsapp