Nitesh Rane: "सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या...", आमदार नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान

मुंबई तक

16 Nov 2024 (अपडेटेड: 16 Nov 2024, 12:53 PM)

Nitesh Rane On Uddhav Thackeray: राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरजार मोर्चेबांधणी केली आहे.

Nitesh Rane On Uddhav Thackeray

Nitesh Rane On Uddhav Thackeray

follow google news

बातम्या हायलाइट

point

नितेश राणेंनी संजय राऊतांवरही केली सडकून टीका

point

"पाकिस्तानमध्ये पण झेंडा फडकवून दाखवू..."

point

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

Nitesh Rane On Uddhav Thackeray: राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरजार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे-ठाकरे यांच्यात शीतयुद्धच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. "सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय. आजकाल त्याच्या बॅगा तपसल्या जातं आहेत. उद्धव ठाकरे हिंदूंचा द्वेष झालाय. तो हिंदू बाबत बोलला तर, जामा मशीदमध्ये बसलेला नवीन अब्बाला वाईट वाटेल. हिंदूच्या बाजूने कोणी बोललं कि जनाब उद्धव ठाकरेला वाईट वाटतं. तुझा मालक मुंबईच्या सातबारावर श्रीधर पाटणकरचा नाव चढविणार होता. ते आम्ही थांबवलं, असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

नितेश राणे म्हणाले, वोट जिहादच उत्तम उदाहरणं म्हणजे तालीबान समर्थक नेमानी. जो तालीबान ला जाहीर समर्थन करतो. आपल्या देशात राहून मुस्लिम लॉ बोर्डची काय गरज? वक्फ बोर्ड फक्त आमच्या देशात आहे. इतर इस्लामिक देशात नाही. देशात ह्यांचे वेगळे लाड का करायचे? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घातली पाहिजे. हा नेमानी मौलवी तालीबान समर्थक आहे. कसाबला जस संपवलं तो नियम ह्या नेमानीला केला पाहिजे. हा आतंकवादी आहे. हया गोष्टी आमच्या राज्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत. ह्या बोर्डवर बंदी टाका. ही अतिरेकी संघटना आहे.  ह्याचा समर्थन करणारा राऊत हिंदू असून पण त्यांचे समर्थन करतो, हे तुमचे तरी होतील का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला.

हे ही वाचा >> Sanjay Raut: "देवेंद्र फडणवीसांना उपचारांची गरज..."; खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका

राणे पुढे म्हणाले, "एक है तो सेफ है हा विचार जर आपण घेतला नाही, तर देवी देवतांची पूजा करू नका. असे फतवे काढतील तेव्हा आमचा हिंदू समाज कुठे जाईल? हाच विचार देवेंद्र फडणवीस देत असतील. पण त्याला विरोध करणारा राऊत आणि कसाब ह्यांच्यात फरक नाही. आम्ही जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकवून दाखवला आहे. पाकिस्तानमध्ये पण झेंडा फडकवून दाखवू. राऊत सटकला आहे. कुत्र्यांच्या हॉस्पिटलला पाठवलं पाहिजे, असं बोललं तर चालेल  का? तुमच्या पाटणकरला पहिले आवरा.  मग अदानीसारख्या देशभक्तावर बोला. आम्ही भगवाधारी लोक आहोत. 23 तारखेनंतर यावर बंदी घालू. नेमनीला कसाबकडे पाठवू, असंही राणे म्हणाले.

हे ही वाचा >> Sushma Andhare: "बाळासाहेबांना खुनी म्हणणाऱ्या निलेश राणेंना...", सुषमा अंधारेंनी CM एकनाथ शिंदेंना सुनावलं

    follow whatsapp