कुवरचंद मंडले, नांदेड: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होताना दिसत आहे. या मतदारसंघात आरक्षण बचावचे अधिकृत उमेदवार चंद्रसेन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याच प्रचारासाठी बाचोटी येथे सभेसाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आले असता अचानक काही तरुणांनी लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यातील गाडीवर तुफान दगडफेक केली. ज्यामुळे या गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेनंतर लक्ष्मण हाके हे देखील अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. (maharashtra assembly election obc leader laxman hake car vandalized by mob in nanded)
ADVERTISEMENT
मराठा समाजाला आरक्षण ओबीसीमधून मिळावं अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. पण याच मागणीला लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला आहे. तेव्हापासूनच हाकेंविरुद्ध जरांगे असा सामना सुरू झाला आहे. अशावेळी आता हाकेंच्या गाडीवर करण्यात आलेला हल्ला यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Sadabhau Khot : टीका करताना बरळलेल्या सदाभाऊंची दिलगिरी, म्हणाले ही गावाड्याची भाषा, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला...
हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके प्रचंड संतापले...
'आज आम्ही लोहा-कंधारमध्ये प्रचारासाठी जात असताना तोंड बांधून हि&$^#@ अवलादींनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे गाव ओबीसींचं आहे. 60 ते 70 टक्के ओबीसी आहेत. अरे ही लोकशाही आहे निजामशाही नाही.. आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत. आम्ही काय बांगड्या नाही भरलेल्या. जोपर्यंत पोलीस या हि&$^#@ अवलादीवर कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही या गावातून हलणार नाही. दम असेल तर समोर यावं.. तोंडं काय बांधताय हि&$^#@ सारखे...'
'लोहा-कंधारचे उमेदवार चंद्रसेन यांच्या प्रचारार्थ आम्ही सगळेजण आलो होतो. आम्ही दिवसभर गावात जाऊन प्रचार करत आहोत. आम्ही कवठा या गावी जात होतो. त्यावेळी बाचोटी या गावातील शंभर-दीडशे तरुण तोंडाला पांढरे गमजे बांधून पोलिसांच्या उपस्थितीत.. विशेष करून.. कारण त्या गावात आधीच पोलीस येऊन थांबलेले होते. पोलिसांना याची कल्पना असताना प्री-प्लॅन आमच्यावर हल्ला केला. आमच्या गाडीच्या काचा फोडल्या.. आमच्या ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली तेव्हा त्यांनी मागच्या बाजूने हल्ला केला. हा जीवघेणा हल्ला होता.'
'ओबीसींनी निवडणूक लढवायची नाही. ओबीसींनी आरक्षणाच्या बाजूने बोलायचं नाही.. ओबीसींनी सभा घ्यायची नाही.. महाराष्ट्रात काय चाललंय? याचं उत्तर शासन-प्रशासनाने दिलं पाहिजे.'
हे ही वाचा>> Election 2024: "माझी राजकीय आत्महत्या...", बंडखोर नाना काटेंची निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?
'येथील पीआयवर उद्या गुन्हा दाखल करणार आहोत. निवडणूक आयोग सर्व यंत्रणेला आम्ही विनंती करणार आहोत. की, असा पक्षपाती भूमिका घेणारा पोलीस पीआय आणि त्याच्या नेतृत्वात इथे निवडणुका होत असतील तर... निलंबितच केलं पाहिजे या व्यक्तीला.'
'वाय दर्जाची आम्हाला सुरक्षा असताना एकही पोलीस आमच्याबरोबर आला नाही. आम्ही येणार आहोत हे पोलिसांना माहिती होतं.'
'आम्ही काय झुंडीने कोणाला शिव्या देण्यासाठी निघालो होतो का? आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमच्या उमेदवारासाठी मतं मागायला निघालो होतो. आमच्याकडे सभांसाठी परवानगी आहे.' असं लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT