Raj Thackeray : राज काकांचा आता पुतण्याविरोधात उमेदवार, आदित्य ठाकरेंना 'हा' मनसैनिक भिडणार!

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 10:58 PM)

Raj Thackeray MNS Candidate List: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत राज ठाकरेंनी 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत राज ठाकरेंनी वरळी मतदार संघातून आपला पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात एक तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.

maharashtra assembly election 2024 raj thackeray mns declare 45 candidate second list aditya thackeray va sandeep deshpande worli constituency

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसेची दुसरी यादी जाहीर

point

आदित्य ठाकरेंविरोधात एक तगडा उमेदवार मैदानात उतरवला

point

आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे.

Raj Thackeray MNS Candidate List: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत राज ठाकरेंनी 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत राज ठाकरेंनी वरळी मतदार संघातून आपला पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात एक तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. (maharashtra assembly election 2024 raj thackeray mns declare 45 candidate second list aditya thackeray va sandeep deshpande worli constituency) 

हे वाचलं का?

राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे वरळी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. याच वरळी मतदार संघातून उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे विधानसभा लढवतात. मात्र ठाकरे विरूद्ध ठाकरे निवडणूक टाळण्यासाठी आता अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे अमित ठाकरे आता माहिम मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहेत. 

हे ही वाचा : Raj Thackeray MNS Candidate List : राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरेला 'या' मतदार संघातून दिलं तिकीट

दरम्यान जरी राज ठाकरेंनी वरळीतून ठाकरे विरूद्ध ठाकरे निवडणूक टाळली असली तरी त्या मतदार संघातून त्यांनी एक तगडा उमेदवार उभा केला आहे. राज ठाकरेंनी वरळी मतदार संघातून संदीप देशपांडे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत आता वरळी विधानसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा : Raj Thackeray MNS Candidate List: मनसेची यादी जाहीर, राज ठाकरेंनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

मनसेची यादी जाहीर 

1. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
2. माहीम - अमित राज ठाकरे
3. भांडुप पश्चिम - शिरीष सावंत
4. वरळी - संदीप देशपांडे
5. ठाणे शहर - अविनाश जाधव
6. मुरबाड - संगिता चेंदवणकर
7. कोथरूड - किशोर शिंदे 
8. हडपसर - साईनाथ बाबर
9. खडकवासला - मयुरेश वांजळे
10. मागाठाणे - नयन कदम
11. बोरीवली - कुणाल माईणकर
12. दहिसर - राजेश येरुणकर
13. दिंडोशी - भास्कर परब
14. वर्सोवा - संदेश देसाई
15. कांदिवली पूर्व - महेश फरकासे
16. गोरेगाव - वीरेंद्र जाधव
17. चारकोप - दिनेश साळवी
18. जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे 
19. विक्रोळी - विश्वजीत ढोलम
20. घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल 
21. घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
22. चेंबूर - माऊली थोरवे 
23. चांदिवली - महेंद्र भानुशाली
24. मानखुर्द-शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
25. ऐरोली - निलेश बाणखेले
26. बेलापूर - गजानन काळे
27. मुंब्रा-कळवा - सुशांत सूर्यराव
28. नालासोपारा - विनोद मोरे
29. भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
30. मिरा-भाईंदर - संदीप राणे
31. शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
32. गुहागर - प्रमोद गांधी
33. कर्जत-जामखेड - रवींद्र कोठारी
34. आष्टी - कैलास दरेकर
35. गेवराई - मयुरी म्हस्के
36. औसा - शिवकुमार नागराळे
37. जळगाव शहर - अनुज पाटील
38. वरोरा - प्रवीण सूर
39. सोलापूर दक्षिण - महादेव कोगनुरे
40. कागल - रोहन निर्मळ
41. तासगांव - कवठे महाकाळ - वैभव कुलकर्णी 
42. श्रीगोंदा - संजय शेळके 
43. हिंगणा - विजयराम किनकर 
44. नागपूर दक्षिण - आदित्य दुरूगकर
45. सोलापूर शहर-उत्तर - परशुराम इंगळे

    follow whatsapp