EVM and Maharashtra Election: नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून, झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला या दोन्ही राज्यांतील निकाल स्पष्ट होणार आहेत. देशाचं लक्ष लागून असलेल्या या दोन्ही राज्यांतील निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने अनेक महत्वाच्या बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. याच पत्रकार परिषदेत ईव्हीएमबद्दल (EVM) प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान, पेजरमधील स्फोटांचे उदाहरण देत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तराची सध्या खूप चर्चा होते आहे. (maharashtra vidhansabha election 2024 when pagers can be blown up why cant evm be hacked election commissioner rajiv kumar responded to the allegations)
ADVERTISEMENT
नुकत्याच पार पडलेल्या हरियाणामधील विधानसभा निवडणुकीतील EVM शी संबंधीत प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली. "हरियाणातील निवडणुकीदरम्यानच्या काही घटनांवरुन उपस्थित केल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ आणि तेही लिखित स्वरुपात देऊ. असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. ईव्हएमची चेकिंग, कमिशनिंग आणि बॅटरी टाकण्याची संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपणे होते. त्यातील बॅटरीवर एजंटची सही असते, तसेच ईव्हीएम जिथे ठेवलं जातं तिथेही सुरक्षेचे तीन कवच असतात असं आयोगाने सांगितलं. यावेळी निवडणूक आयोगाने अनेक प्रश्नांची उत्तरं देत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा>> Exit Polls: 'एक्झिट पोल फालतू, फ्रस्ट्रेशन... कलही बनावट', मुख्य निवडणूक आयुक्त का म्हणाले असं?
पेजर हॅक होऊ शकतं, मग EVM का नाही?
निवडणूक आयोगाच्या याच पत्रकार परिषदेत EVM हॅकिंगबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. EVM आणि पेजरच्या होत असलेल्या तुलनेबद्दल यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलं. "काही लोकांनी शंका उपस्थित केली, की पेजर उडवलं जाऊ शकतं तर EVM का नाही? अशा लोकांना समजलं पाहिजे की, पेजर हे कनेक्टेड असतं तर EVM हे कोणत्याही यंत्रणेशी कनेक्टेड नसते. तसंच ईव्हीएमची पोलिंग एजंट्समार्फत अनेकदा पडताळणी देखील केली जाते, त्यामुळे त्यामध्ये फेरफार करणं अशक्य आहे.' असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : 'मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंय, पण त्यांना...', जरांगेंचा रोख नेमका कुणावर
EVM ला सुरक्षेचे तीन कवच
निवडणूक होण्यापूर्वी 5-6 दिवस आधी ईव्हीएम मशिनचं कमिशनिंग केलं जातं. त्यावेळीच त्यामध्ये बॅटरी टाकली जाते. तसंच त्यानंतर ईव्हीएमला सील केलं जातं. तसंच ईव्हीएमममध्ये टाकल्या जाणाऱ्या बॅटरीही इतर बॅटरीपेक्षा वेगळ्या असतात. ही बॅटरी फक्त एकदाच वापरात येणारी बॅटरी असते. यावेळी कॅलक्युलेटरचं उदाहरण देण्यात आलं. तसंच या बॅटरीवर उमेदवारांच्या एजंट्सकडून सही देखील केली जाते. तसंच ही प्रक्रिया पार पडल्यानंतर हे ईव्हीएम ज्या स्ट्राँग रूममध्ये ठेवले जाते, तिथेही सुरक्षेचे तीन कवच असतात.
संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेऱ्याची नजर
वोटिंग बूथवर जेव्हा ईव्हीएम पाठवले जातात तेव्हा या संपूर्ण गोष्टींची व्हिडीओग्राफी केली जाते. कोणती मशीन किती नंबरच्या बूथवर जाणार या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. तसंच बूथवर गेल्यावर पोलिंग एजंट्ना मतदान देखील करून दाखवलं जातं.
ADVERTISEMENT