Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात मागच्या काळात घडलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे महत्वाची होती. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून आहे. 20 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणूकीचं मतदान 23 नोव्हेंबरला सकाळपासूनच जाहीर होण्यास सुरुवात होईल. या निवडणुकीपूर्वी आलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलने निकालाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढवली आहे. मात्र हा निकाल कसा पाहावा? तुमच्या मतदारसंघात कोणते उमेदवार उभे होते? तिथे विजय कुणाचा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
निकाल कसा आणि कुठे पाहाल?
हे ही वाचा >>Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर
1. निवडणुकांचे निकाल कधी लागणार?
23 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 7 वाजता तुम्हाला 'मुंबई Tak'वर निकाल पाहता येईल.
2. निकाल कसा पाहाल?
https://www.mumbaitak.in/ या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला निकाल आणि सविस्तर विश्लेषण वाचता येणार आहे.
3. निकालाचे विश्लेषण कसे पाहाल?
https://www.youtube.com/@MumbaiTak/community या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही 'मुंबई Tak'च्या युट्यूब चॅनलवर जाल, त्यानंतर तुम्हाला Live सेक्शनवर जाऊन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून समजून घेता येईल.
4. विधानसभा निवडणूक 2024 ला किती टक्के मतदान?
विधानसभा 2024 च्या निवडणुकीत 66.05 टक्के मतदान झालं आहे. मागच्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये झालेलं हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 मध्ये 71.7 टक्के मतदान झालं होतं.
5. विधानसभेचा कालावधी कधी संपणार?
विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबररोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निकाल स्पष्ट होणं अनिवार्य असते. त्यानंतर राज्यात 26 नोव्हेंबररोजी सत्ता स्थापन होणं अपेक्षित आहे.
सत्तास्थापन न झाल्यास काय होऊ शकतं?
हे ही वाचा >>Assembly Elections Exit Poll 2024 : सरकार 'यांचं' येणार! 'या' एक्झिट पोलने कोणाची उडवली झोप?
राज्यात 23 नोव्हेंबरला 288 विधानसभा मतदारसंघाचे निकाल स्पष्ट होणार आहेत. यामध्ये कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 144 पेक्षा अधिक जागा मिळणं आवश्यक आहे. जर तो आकडा कुणालाच गाठता आला नाही तर अटीतटीच्या परिस्थितीत अपक्ष आणि लहान पक्षांची मदत घेण्याचा प्रयत्न महायुती किंवा महाविकास आघाडी करेल. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटीक्स पाहायला मिळू शकतं. त्यानंतर ज्यांच्याकडे 144 पेक्षा जास्त आमदार असतील, ती युती किंवा आघाडी जाऊन सत्तास्थापनेचा दावा करेल.
ADVERTISEMENT